अंबडला घरात घुसून तरुणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 17:45 IST2018-09-09T17:44:30+5:302018-09-09T17:45:46+5:30
नाशिक : अनधिकृतपणे तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर परिसरात घडली. या प्रकरणी राहुल नंदू वाघ (रा.नाशिकरोड) या संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

अंबडला घरात घुसून तरुणीचा विनयभंग
नाशिक : अनधिकृतपणे तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर परिसरात घडली. या प्रकरणी राहुल नंदू वाघ (रा.नाशिकरोड) या संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पीडित तरुणी घरात असताना संशयित वाघ हा घरात घुसला़ यानंतर तरुणीला माझ्यासोबत चल मला तुझ्याशी एकांतात बोलायचे आहे असे म्हणून तिच्यावर बळजबरी करू लागला़ यावेळी तरुणीचे वडील, तिचा भाऊ व मामा यांनाही शिवीगाळ करून वाघ याने दमदाटी केली़
दरम्यान, संशयित वाघ हा तरुणीसह तिच्या कुटुंबीयांचा परिचित असून, त्याचे नशेत हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले़