माजी विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:22 IST2019-09-14T22:23:05+5:302019-09-15T00:22:02+5:30
श्री जयरामभाई हायस्कुलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून शालेला सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यात येत आहे. माजी विद्यार्थ्यांकडून एका वर्गाचे करण्यात येत असलेल्या नूतनीकरण करण्यात आले. या खोली वर्गाचा उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला.

जयरामभाई हायस्कूलमध्ये वर्गखोलीच्या नूतनीकरणच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मो. स. गोसावी, शैलेश गोसावी, प्राचार्य राम कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, किशोर कटारे, चेतन सोनवणे, जयंत खैरनार, के. यू. चव्हाण, डी. के. पवार आदी.
नाशिकरोड : श्री जयरामभाई हायस्कुलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून शालेला सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यात येत आहे. माजी विद्यार्थ्यांकडून एका वर्गाचे करण्यात येत असलेल्या नूतनीकरण करण्यात आले. या खोली वर्गाचा उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो.स.गोसावी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक शैलेश गोसावी, प्राचार्य राम कुलकर्णी उपस्थित होते. २००३ च्या बॅचचे माजी विद्यार्थी आशिष कुलकर्णी, किशोर कटारे, चेतन सोनवणे आदिंनी पुढाकार घेत आपल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून शाळेच्या एका वर्ग खोलीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ संस्थेचे सचिव डॉ. मो.स. गोसावी यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी एका खोलीचे नूतनीकरण करून त्यानंतर शाळेतील सर्व वर्ग खोल्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. काही रूम तयार करणार आहेत. याच पद्धतीने सर्व वर्गखोल्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. या उपक्रमासाठी शिक्षक के.यु. चव्हाण, डी.के. पवार यांनी सहकार्य केले. माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून हा उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थी तेजस तुपे, लक्ष्मण शेंडगे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक जे. एन. खैरनार यांनी केले. सूत्रसंचलन तुषार खांडबहाले व आभार चेतन सोनवणे यांनी मानले. यावेळी आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.