सटाणा येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 10:35 PM2019-11-03T22:35:21+5:302019-11-03T22:36:00+5:30

सटाणा : येथील व्हि. पी. एन. हायस्कूल येथे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल एकतीस वर्षानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून एकित्रत करीत सटाणा येथील श्री स्वामी समर्थ लॉन्स येथे उल्हासित वातावरणात स्नेह संमेलन मेळावा पार पडला.

Alumni rally in Satana cheers | सटाणा येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

सटाणा येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

googlenewsNext
ठळक मुद्देअध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी तथा मेजर माणिक निकम होते.

सटाणा : येथील व्हि. पी. एन. हायस्कूल येथे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल एकतीस वर्षानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून एकित्रत करीत सटाणा येथील श्री स्वामी समर्थ लॉन्स येथे उल्हासित वातावरणात स्नेह संमेलन मेळावा पार पडला.
येथील हायस्कूल मध्ये सन १९८८ मध्ये दहावीत शिक्षण घेतलेल्या बँचचा स्नेह संमेलन मेळावा नुकताच पार पडला.
या मेळाव्यात सकाळी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपला जीवनपट मनोगतातून व्यक्त करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तद्नंतर व्हि. पी. एन. हायस्कूलचे संस्थापक कै. पंडितराव धर्माजी पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी समाधीस्थळी जावून अभिवादन केले. जाधव यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.विजय भांगडिया व रंजना सोनवणे यांना या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी तथा मेजर माणिक निकम होते.
सदर स्नेहसंंमेलनास माजी विद्यार्थी अभय चंद्रात्रे, प्रकाश देवरे, ज्ञानेश्वर सोनवणे, दिपक पवार, मंगेश पंडित, रवि वाघ, किशोर पाटील, सुनिल भामरे, प्रविण सोनवणे, रविंद्र देवरे, सुरेखा देवरे, मिना कुलकर्णी, सुनिता काकळीज, भारती बिरारी, रु पाली कापडणीस, केशव मांडवडे, नानू आहेर, अहमद सैय्यद, सुब्राव सोनवणे, तुषार वाघ, वैशाली सावंत, किरण सोनवणे, बाळा बोरसे आदी सहभागी झाले होते. सुत्रसंचालन प्रा. धनंजय पंडित यांनी तर नितीन बागड यांनी आभार व्यक्त केले.
 

Web Title: Alumni rally in Satana cheers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.