शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 8:08 PM

भाऊसाहेबनगर : के. के. वाघ शिक्षण संस्था आणि संस्थेचे क का वाघ विदयाभवन भाऊसाहेबनगर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मंगळवारी मोठया उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यासाठी सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देभाऊसाहेबनगर : के. के. वाघ शिक्षण संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

भाऊसाहेबनगर : के. के. वाघ शिक्षण संस्था आणि संस्थेचे क का वाघ विदयाभवन भाऊसाहेबनगर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मंगळवारी मोठया उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यासाठी सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने वर्षभर विविध कार्यक्र म घेतले जात आहेत. तसेच वाघ विदयाभवन, गीताई वाघ कन्या विद्यालय, वाघ माध्यमिक विद्यालय या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मंगळवारी (दि.५) उत्साहात संपन्न झाला.विदयाभवनात सकाळी परिपाठाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. पं.शंकरराव वैरागकर या सेवानिवृत्त संगीत शिक्षकांनी प्रार्थना घेतली. मला काय वाटते ? सुविचार आणि आजचा दिन विशेष माजी विद्यार्थ्यांनी सादर केला. संस्थेचे सचिव के. एस. बंदी, मुख्याध्यापक जयश्री पानगव्हाणे, मुख्याध्यापक सी. पी. कुशारे यांनी प्रार्थनेसह ओकार म्हटला. टोल दिल्यानंतर माजी प्राचार्य एस. जी. गायकवाड, आर. आर. चव्हाण प्राचार्य रविंद्र मोरे, डी. के. रुईकर, एच. पी. गुरुळे, प्रा. शि. क. नाठे, प्राचार्य उषा साळी, शकुंतला होळकर आदी सेवानिवृतान्ांी माजी विद्यार्थी वर्गाला अध्यापन केले. यानंतर वाघ संस्थेच्या संबंधीच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर संस्था अध्यक्ष बाळासाहेब वाघ, शकुंतला वाघ, चांगदेव होळकर. संस्थेचे पहिले अध्यक्ष विजय मोरे, विश्वस्त समीर वाघ, अजिंक्य वाघ यांचे उपस्थितीत सरस्वती पूजन करण्यात आले. प्रास्ताविक एस. बी. गाडे यांनी केले. यावेळी सुनिल मोरे, मंगेश वडजे, संगीता करंडे, मंजिरी वाघ कावरे, अशोक बोरस्ते, अभिजित साबळे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, दिवंगत कर्मचारी यांचे कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. सन्मानार्थीच्या वतीनेमाजी शिक्षणाधिकारी व्ही. जी. बोरस्ते, डॉ. राहुल घायाळ, गुरुकुलचे श्रीकांत ढवळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्राचार्य मेळावा समन्वयक एम. बी. झाडे आणि डॉ. एन. बी. गुरु ळे यांनी मानले. पं. वैरागकर यांचे पसायदानाने कार्यक्र माची सांगता झाली. सुत्रसंचालन प्रा. वाय. के. ढगे आणि स्वाती पवार यांनी केले.यानंतर सांस्कृतिक कार्यक्र म, क्र ीडास्पर्धेत माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन रंगत आणली.यावेळी मनपा नगरसेवक प्रशांत जाधव, पं. स.सदस्य पंडीत आहेर, विलास महासागर, तानाजी प्रकरण, डॉ. नितिन नेरे, डॉ. छाया नवले, डॉ. योगिता पाटील. उद्योजक निर्मला पाटील माने, अनंतराव नीळ, सोमनाथ काळे. राजेंद्र बोरस्ते, विजयालक्ष्मी मणेरीकर, योगेश देवरगावकर, प्राचार्य अविनाश दरेकर, डॉ.सचिन कुशारे, भुमिलेख अधीक्षक पल्लवी पाटील, मनिषा पाटील, अँड.अनुराधा मोगल, डॉ.अदिती पाटील, अँड. शशिकांत दळवी, केतकी हांडे, ज्योत्स्ना केदार, सुनिता कराड यांचेसह सेवानिवृत शिक्षक प्रकाश येवलकर, डी. एन. भामरे, बाबुराव देवरे, नारायण भवर, तानाजी पाटील, अंबादास नाठे, जी. बी. शेख, अनुराधा घोडके, मंदाकिनी पवार आदींसह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी