शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
2
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
3
शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
4
उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
5
Pune Porsche Accident News इतर लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग केल्यावर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती
6
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
7
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
8
"भाजपा १५० च्या वर जाणार नाही", माजी केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
9
IPL संपताच जय शाह यांची मोठी घोषणा; Ground Staff कर्मचाऱ्यांना मिळाले मोठे बक्षीस
10
जादू की झप्पी! जवळच्या व्यक्तीला मिठी मारा अन् 'या' आरोग्यविषयक तक्रारींपासून राहा दूर
11
Pune Porsche Accident News रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
12
गौतम गंभीर तर आहेच... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या चॅम्पियन बनण्याच्या प्रवासातील हेही शिलेदार
13
Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य
14
अश्विनी कासारला लोकलमध्ये महिलेने मारली लाथ, पोलिसांना टॅग करत शेअर केला व्हिडिओ
15
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
16
Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?
17
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
18
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
19
Pune Porsche Accident News पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर 'बाळा'चे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
20
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा

मनपाच्या रुग्णालयांमध्ये दाेन पर्यायी ऑक्सिजन टाक्या

By संजय पाठक | Published: April 24, 2021 1:22 AM

शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर रुग्णांना पर्यायी ऑक्सिजन उपलब्ध देताना विलंब झाला त्यातून २४ जणांचे बळी गेले. त्यामुळे आता या रुग्णालयात तसेच नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात आता आणखी दोन पर्यायी ऑक्सिजन टाक्या उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

ठळक मुद्देनिर्णय : दुर्घटना टाळण्यासाठी पर्यायी यंत्रणेची उभारणी

नाशिक :  शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर रुग्णांना पर्यायी ऑक्सिजन उपलब्ध देताना विलंब झाला त्यातून २४ जणांचे बळी गेले. त्यामुळे आता या रुग्णालयात तसेच नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात आता आणखी दोन पर्यायी ऑक्सिजन टाक्या उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शुक्रवारी (दि.२३) वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. गेल्यावर्षी कोरोनाचे संकट उद्‌भवल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयात अनेक उणिवा स्पष्ट झाल्या होत्या. घेतला आहे. २१ केएल ऑक्सिजन टाक्या बांधण्याचा निर्णयऑक्सिजन आणि व्हेंटिलरबरोबरच ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे आढळले होते. त्यामुळे महापालिकेने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ऑक्सिजन पुरवठा करताना तत्काळ टँकर आले नाही तर किमान रुग्णालयांना काही दिवस दिलासा देता येईल, या दृष्टीने झाकीर हुसेन रूग्णालयात १३ तर बिटको रुग्णालयात २१ केएल ऑक्सिजन टाक्या बांधण्याचा निर्णय घेतला. त्यातील झाकीर हुसेन रुग्णालयातील टाकी तर ३१ मार्च राेजीच बसविण्यात आली होती. आलटून पालटून दिला जाणार ऑक्सिजनमहापालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये दोन पर्यायी टाक्या तीन केएलच्या असतील. सध्याच्या टाक्या आणि त्याला  पर्याय म्हणून उभारण्यात येणाऱ्या या टाक्या यातून आलटून-पालटून ऑक्सिजन रुग्णांना  दिला जाईल. एखादी दुर्घटना घडलीच तर किमान एकातरी टाकीमधील ऑक्सिजनमधून रुग्णांचे प्राण वाचू शकतील.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटल