शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

स्वेटरबरोबरच नाइट सूट खरेदीही वादात

By admin | Updated: September 30, 2016 02:36 IST

आदिवासी विकास विभाग चर्चेत

 नाशिक : कुपोषणामुळेच नव्हे तर विविध खरेदींमुळे चर्चेत असलेल्या आदिवासी विकास विभागाची स्वेटर खरेदी चर्चेत आली असतानाच विद्यार्थ्यांना रात्री घालण्यासाठी खरेदी केलेली ‘नाइट सूट’ खरेदीही वादात सापडली आहे. विशेष म्हणजे, नोकरभरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पुरावे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या आदिवासी विकासमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिले.अन्य खरेदींना वित्तीय मान्यतेनंतरच देयके अदा होत असताना मागील वर्षी करण्यात आलेली नाईट सूटची २२ कोटींची खरेदी अािण देयके ही वित्तीय मान्यतेआधीच करण्यात आल्याची चर्चा आहे. मागील वर्षी पावसाळा उलटल्यानंतर रेनकोट खरेदी आणि हिवाळा संपल्यानंतर उन्हाळ्यात स्वेटर खरेदी करण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सारवा-सारव करीत या दोन्ही खरेदी रद्द केल्या होत्या. मागील वर्षी शंभर टक्के लोकर (वूलन) असलेले स्वेटर ११०० रुपयांना घेण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी १३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. यावर्षी तर ५० टक्के लोकर व ५० टक्के खादी (कॉटन) मिश्रित स्वेटर घेण्यासाठी निविदा काढण्यात येऊन त्यासाठी तरतुदीत चक्क ७ कोटींनी वाढ करून ती २० कोटी रुपयांपर्यंत फुगविण्यात आल्याची चर्चा आहे. शिवाय या स्वेटर खरेदीसाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये १९ निविदांपैकी तीनच निविदा मुंबई येथील एका खासगी प्रयोगशाळा तपासणीत पात्र ठरल्याची चर्चा आहे. स्वेटर खरेदीसाठी निविदेच्या फॉर्मची किंमतच ५० हजार रुपये आणि अनामत १० लाख रुपये असताना निविदाधारक आदिवासी विकास विभागाकडे पुरवठा करण्यासाठी पाठविलेले स्वेटरचे नमुने अपात्र ठरतील, असे नमुने का पाठवतील, ठराविक तीनच त्यातही मागील वर्षीच्याच पुणे येथील कंपनीचेच नमुने कसे पात्र ठरले, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. विशेष म्हणजे वसतिगृह व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या साबण, तेल, टूथब्रश यांसह अन्य साधनांच्या खरेदीसाठी वित्तीय मान्यता चार- पाच महिने मिळत नसताना स्वेटर खरेदीची मान्यता मात्र रातोरात कशी मिळते, असा आरोप आता करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)