महाआरतीसोबतच व्यसनमुक्तीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:51 IST2018-05-26T00:51:35+5:302018-05-26T00:51:35+5:30
जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे शिष्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत जय बाबाजी परिवाराच्या वतीने आयोजित महाआरती व सत्संग सोहळ्यात व्यसनमुक्तीचा संकल्प केला.

महाआरतीसोबतच व्यसनमुक्तीचा संकल्प
नाशिक : जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे शिष्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत जय बाबाजी परिवाराच्या वतीने आयोजित महाआरती व सत्संग सोहळ्यात व्यसनमुक्तीचा संकल्प केला. जय बाबाजी भक्त परिवाराने शुक्रवारी (दि.२५) गोल्फ क्लब मैदानावर महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत यंदाच्या पावसाळ्यात चांगली पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी महाआरती करण्यात आली. यावेळी आयोजित सत्संग सोहळ्यात शांतिगिरी महाराजांनी भक्तपरिवाराला व्यसनमुक्तीचा संदेश दिला. ज्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे व्यसन होते त्यांनी ते त्यागण्याचा या सत्संग सोहळ्याच्या निमित्ताने संकल्प केला. यावेळी शांतगिरी महाराजांनी भक्तपरिवाराला माता-पित्याच्या सेवेचा संदेश देताना कोणत्याही परिस्थितीत आपल्या जन्मदात्यांना आंतर देऊ नका, असे आवाहन केले. यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराचे ब्रह्मचारी नागेश्वरानंद महाराज नगरसेवक भागवत आरोटे, रामेश्वर शिंदे विष्णू महाराज आदी उपस्थित होते.