धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 18:08 IST2021-03-17T18:07:28+5:302021-03-17T18:08:27+5:30

पेठ : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात आवश्यक ते नियमांचे पालन करून पेठ तालुक्यात धार्मिक कार्यक्रमांना रितसर परवानगी मिळावी, अशी मागणी वारकरी महामंडळाच्या वतीने निवेदनाव्दारे केली आहे.

Allow religious events! | धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्या !

पेठ नायब तहसीलदार मिनाक्षी बैरागी यांना निवेदन देताना पंढरीनाथ वालवणे, भिमाशंकर राऊत, रामदास शिरसाठ, संतोष देशमूख, किसन गावित, चंद्रकांत गवळी, संजय रहाणे आदी.

ठळक मुद्देमहाराष्ट्र वारकरी महामंडळाचे निवेदन

पेठ : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात आवश्यक ते नियमांचे पालन करून पेठ तालुक्यात धार्मिक कार्यक्रमांना रितसर परवानगी मिळावी, अशी मागणी वारकरी महामंडळाच्या वतीने निवेदनाव्दारे केली आहे.
बुधवारी (दि.१७) नायब तहसिलदार मीनाक्षी बैरागी यांना दिलेल्या निवेदनात धार्मिक कार्यक्रम बंद असून शासनाने घालून दिलेले नियम, अटी यांचे पालन करुन कार्यक्रम सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष पंढरीनाथ वालवणे, भिमाशंकर राऊत, रामदास शिरसाठ, संतोष देशमूख, किसन गावित, चंद्रकांत गवळी, संजय रहाणे, देवराम ठाकरे, आर. डी. भोये, बाबा गाडर, नामदेव देशमूख, उमाकांत शिंदे तसेच पेठ तालुक्यातील वारकरी मंडळी उपस्थित होते.
 

Web Title: Allow religious events!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.