संक्रातीनिमित्त विद्यार्थ्यांना अकराशे पतंगीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 05:19 PM2020-01-13T17:19:14+5:302020-01-13T17:21:52+5:30

दुर्गामाता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संस्थानच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन शाळेतील सुमारे अकराशे विद्यार्थ्यांना पतंगीचे वाटप करून तिळगुळ देण्यात आले

Allotment of eleven kites to the students for Sankranti | संक्रातीनिमित्त विद्यार्थ्यांना अकराशे पतंगीचे वाटप

संक्रातीनिमित्त विद्यार्थ्यांना अकराशे पतंगीचे वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देअकराशे विद्यार्थ्यांना पतंगीचे वाटप करून तिळगुळ देण्यात आलेपंतग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर करु नये

नाशिक : जेलरोड येथील दुर्गामाता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संस्थानच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन शाळेतील सुमारे अकराशे विद्यार्थ्यांना पतंगीचे वाटप करून तिळगुळ देण्यात आले.
        दुर्गा माता देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक शैलेश ढगे यांनी जेलरोड हॉलीप्लॉवर शाळा व अभिनव मराठी शाळेतील सुमारे अकाराशे विद्यार्थ्यांना पंतग व तीळगुळ वापट करण्यात आले. त्यावेळी रमेश डहाळे यांनी संक्र ात सणाविषयी माहिंती दिली. हा सण एक भौगोलिक व सांस्कृतिक सण आहे. तसेच पंतग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर करु नये. त्यामुळे पक्षांना , माणसाना, दुखापत होण्याची शक्यता असते असे त्याांनी सांगितले. तर हॉलीप्लॉवर शाळेचे संचालक सुदीप देब व अभिनव शाळेच्या मुख्यध्यापिका भालके यांनी विद्यार्थ्यांना पंतग उडविताना घ्यावयाची काळजी व पर्यावरण संरक्षण बाबत मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष अशोक वाणी, जोशी, गजानन महाजन, मधुकर शेलार, योगेश कपिले, बाळासाहेब जाधव , अविनाश यादव, शेखर सरोदे आदि उपस्थित होते.

Web Title: Allotment of eleven kites to the students for Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.