शालेय विद्यार्थ्यांना बुटांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 17:10 IST2020-02-12T17:10:25+5:302020-02-12T17:10:35+5:30
ब्राह्मणगाव : येथील कसाडपाडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इनरव्हील क्लब मिडटाउन सटाणातर्फे शालेय विद्यार्थ्यांना बुटांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सरला अहिरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून के.एन. अहिरे, यशवंत अहिरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, माजी उपसरपंच गोटू पगार, नरेंद्र अहिरे, प्रकाश बधाण, रवींद्र थोरात, ग्रामविकास अधिकारी एन.एन. सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांना बुटांचे वाटप
ठळक मुद्दे कार्यक्र माच्या सुरु वातीस सरस्वती मातेचे पूजन इनरव्हील क्लब आॅफ मिडटाउनचे अध्यक्ष स्मिता येवला, सदस्य रूपाली निकुंभ, संगीता खानकरी, पूनम अंधारे, मिताली सूर्यवंशी, सुनीता अहिरे आदींच्या हस्ते करण्यात आले.
सूत्रसंचालन शिक्षक संजय भामरे यांनी केले, तर आभार विवेक पाटील यांनी मानले.
फोटो - कसाडपाडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना सॉक्स व शूजचे वाटप करताना इनरव्हील क्लब मिडटाउन सटाण्याचे अध्यक्ष स्मिता येवला व क्लबचे सदस्य, शेजारी सरपंच सरला अहिरे आदी. (12 इनरव्हील क्लब)