शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्याची सर्वच कामे अपूर्ण

By admin | Updated: April 2, 2015 00:54 IST

३१४ पैकी २३२ कामे प्रगतिपथावर : एप्रिलअखेर ‘डेडलाईन’

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून विविध पातळीवर आराखडा व नियोजन करून मंजुरी देण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या ३१४ कामांपैकी मार्चअखेर एकही काम पूर्ण होऊ शकलेले नसल्याने पुन्हा एकदा कामाच्या संथगतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. प्रत्येक विभागनिहाय घेतलेल्या आढाव्यात २३२ कामे अजूनही प्रगतिपथावर असल्याचे, तर ८२ कामांना अद्याप सुरुवातच झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने आता ही कामे पूर्ण करण्यासाठी एप्रिलअखेरची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे.मार्चअखेरपर्यंत कामे पूर्ण न करणाऱ्यांमध्ये नाशिक महापालिकेचा वरचा क्रमांक असून, त्यांच्या ९४ कामांपैकी १४ कामे अद्याप सुरूच होऊ शकलेली नाहीत, तर शहर पोलीस विभागाच्या आठ कामांपैकी पाच कामे तशीच पडून आहेत. आरोग्य विभागाच्या कामांबाबतही हीच परिस्थिती असून, पुरातत्व खात्याकडून कामांचा आराखडाच उशिरा सादर करण्यात आल्याने त्यांनी सुचविलेल्या सहा कामांपैकी एकही काम सुरू होऊ शकलेले नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहापैकी चार कामे, तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचेही सहापैकी पाच कामे होऊ शकलेली नाहीत. कुंभमेळ्याशी निगडित २२ यंत्रणांच्या कामांचा आढावा बुधवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी घेतला असता, मार्चअखेर एकाही विभागाचे एकही काम पूर्ण झाले नसल्याचे आढळून आले. सिंहस्थ कुंभमेळा दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना शासकीय यंत्रणांची संथगती पाहता, या कामांच्या दर्जाबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. बुधवारी झालेल्या बैठकीत कुंभमेळ्यात ऐनवेळी करावयाच्या कामांचीही चर्चा होऊन त्याचेही नियोजन आत्तापासून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रगतिपथावर असलेली २३२ कामे एप्रिलअखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची कालमर्यादा घालून देण्यात आली आहे. कामे उशिरा सुरू होण्यामागे निधीची अपूर्तता, निविदा प्रक्रियेला झालेला विलंब याच बाबी पुढे करण्यात आल्या आहेत.