तिन्ही ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:36 IST2021-01-21T21:14:50+5:302021-01-22T00:36:12+5:30

वसंत तिवडे त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. तीन ग्रामपालिकांपैकी पेगलवाडी ही मोठी ग्रामपंचायत आहे. तिन्ही ठिकाणी सरपंचपदासाठी आता चुरस बघायला मिळणार आहे.

In all the three Gram Panchayats, there is a shortage of Sarpanch posts | तिन्ही ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी चुरस

तिन्ही ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी चुरस

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : पेगलवाडीतील घडामोडींकडे लक्ष ; आरक्षणाबाबत उत्कंठा

त्र्यंबकेश्वर तालुक्यात आघाडीलाच कौल मिळाल्याने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचा वरचष्मा आहे. फक्त विजयनगर अर्थात डहाळेवाडी येथे तीन सदस्यांचा भाजपचा एक गट निवडून आला आहे. पेगलवाडी ना. येथील नामदेव झोले हे स्वतः एका मताने पराभूत झाले. पण त्यांच्याच घरातील रवींद्र बाळु झोले, कविता (नीलम) रवींद्र झोले पदमा नामदेव झोले निवडून आले आहेत. याठिकाणी महिलांसाठी सरपंचपद आरक्षित झाल्यास पदमा नामदेव झोले किंवा कविता बाळू झोले यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. पुरुषाचे आरक्षण पडल्यास रवींद्र बाळु झोले हे सरपंचपद भूषवतील. तथापि समोरच्या गटाला देखील एकच सदस्य हवा आहे. त्यामुळे गोकुळ निंबेकर, सुरेश उजे किंवा रेखा शांताराम झोले , छाया भास्कर यापैकी कुणाची लॉटरी लागते हे येणारा काळच ठरवेल.
विजयनगर तथा डहाळेवाडी या ग्रामपंचायतीत प्रकाश खाडे, उषा डहाळे व शोभा पाडेकर हे सरपंचपदाच्या शर्यतीत आहेत तर ईश्वर भांडकोळी, नीलेश जाखेरे, नंदा वाघ , शकुंतला वाघ या चार जणांचे पॅनल असले तरी वेळेवर काय राजकारण घडेल यावरच पुढचे अवलंबून असेल.

Web Title: In all the three Gram Panchayats, there is a shortage of Sarpanch posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.