दिव्यांगांसाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:31 IST2019-10-20T23:07:10+5:302019-10-21T00:31:06+5:30
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानात सुलभता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्र हे आता तळमजल्यावर आले आहेत. जिल्ह्यातील १२,००० दिव्यांग मतदारांनादेखील यामुळे सुलभता होणार असून, त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.

दिव्यांगांसाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर
नाशिक : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानात सुलभता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्र हे आता तळमजल्यावर आले आहेत. जिल्ह्यातील १२,००० दिव्यांग मतदारांनादेखील यामुळे सुलभता होणार असून, त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.
दिव्यांगांमध्ये मतदानाची जनजागृती करून त्यांच्यासाठी मतदान केंद्रांवर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सर्व दिव्यांगांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याची व्यवस्था करावी, त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर्स, ब्रेललिपीतील मतपत्रिका अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्यामुळे दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे सोयीस्कर होईल तसेच पीडब्लूडी अॅप (पर्सन विथ डिजअॅबेलिटी)च्या माध्यमातून दिव्यांगांना मतदानाशी संबंधित मतदही मागता येणार आहे. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना दिव्यांग व्यक्तींसाठी सक्षम प्रवेश योग्य व अडथळा मुक्त वातावरण तयार करण्याच्या सूचना आहेत.