शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

छुप्या पद्धतीने परराज्यातून मद्य वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:57 IST

दादरा नगरहवेली, दीव-दमण यांसारख्या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस मान्यता असलेला मद्यसाठा राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित आहे. सिल्व्हासा येथून अशाच प्रकारच्या विविध ब्रॅण्डच्या मद्याच्या एकूण ३७९ बाटल्यांची नाशिकमार्गे गुजरातच्या दिशेने होणारी चोरटी वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ने वाघेरा-हरसूल रस्त्यावर रोखली.

ठळक मुद्देभरारी पथकाची कारवाई : ३७९ मद्याच्या बाटल्यांची वाहतूक रोखली

नाशिक : दादरा नगरहवेली, दीव-दमण यांसारख्या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस मान्यता असलेला मद्यसाठा राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित आहे. सिल्व्हासा येथून अशाच प्रकारच्या विविध ब्रॅण्डच्या मद्याच्या एकूण ३७९ बाटल्यांची नाशिकमार्गे गुजरातच्या दिशेने होणारी चोरटी वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ने वाघेरा-हरसूल रस्त्यावर रोखली. चोरट्या पद्धतीने महिंद्र जीपमध्ये दडवून वाहून नेणारा मद्यसाठा जप्त केला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला असून, शहरासह जिल्ह्याच्या वेशीवर तात्पुरत्या स्वरूपात स्थिर सीमावर्ती नाके कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच गस्ती पथकदेखील सक्रिय असून, भरारी पथक क्रमांक-१चे निरीक्षक मधुकर राख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे त्यांनी गिरणारे-हरसूल मार्गावर वाघेरा फाटा येथे सापळा रचला. एका चारचाकी जीपमधून चोरट्या पद्धतीने मद्यवाहतूक केली जाणार असल्याची खात्रीशीर माहिती त्यांच्याकडे होती. त्यानुसार दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, जवान अरुण सुत्रावे, श्याम पानसरे, धनराज पवार, विलास कुवर आदींनी सापळा रचला. गिरणारे शिवारातून महिंद्र बोलेरो जीप (जीजे १४ एक्स ६३९३) यावर पथकाला संशय आला. पथकाने जीप रोखून जीपची बारकाईने पाहणी करताना कर्मचाऱ्यांना चेसीच्या खाली (बॉडीमध्ये) मागील बाजूने चोरटी जागा खास तयार करून घेतली गेली आहे. त्यामुळे पथकाचा संशय बळावला. गुजरात राज्यातील गीर सोमनाथ जिल्ह्याचा रहिवासी असलेला जीपचालक फरीदभाई रखाभाई उनडजाम (३७) यास ताब्यात घेतले असता त्याने त्या चोरट्या जागेत मद्याच्या बाटल्या असल्याची कबुली दिली. पथकाने तत्काळ जीपसह चालकास नाशिक येथील कार्यालयात आणून जीपची झडती घेत ती चोरटी जागा उघडली असता त्यामधून विविध ब्रॅण्डच्या तब्बल ३७९ मद्याच्या बाटल्यांचा साठा हस्तगत केला. मद्यसाठा व वाहन असा एकूण १० लाख ५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राख करीत आहेत.मासे वाहतुकीचा बनावथर्माकोलच्या खोक्यांना माशांचा वास लागलेला असल्यामुळे तपासणी नाक्यांवर कर्मचाऱ्यांना संशय येणार नाही व चोरट्या जागेत दडवून ठेवलेले मद्य सहजरीत्या वाहून नेणे शक्य होईल म्हणून चालक व मालकाने शक्कल लढविली; परंतु क र्मचाºयांच्या सतर्कतेमुळे बनाव फसला. प्रथमदर्शनी जीपमध्ये केवळ थर्माकोलची रिकामी खोकी अस्ताव्यस्त पद्धतीने भरलेली दिसून आली अन् तेथेच चोरट्या मद्य वाहतुकीचा संशय अधिकच बळावला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयliquor banदारूबंदी