शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

आला हजरत स्मृतिदिन : जुलूसमध्ये शेकडो मुस्लीम बांधव सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 5:30 PM

इस्लामचे थोर अभ्यासक व धार्मिक साहित्यकार आला हजरत यांनी समाजाला दिशा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुराण व हदीसला अनुसरून दर्जेदार लिखाण केले आहेत.

ठळक मुद्दे विविध मशिदींमध्ये ‘उरूस-ए-आला हजरत’चा कार्यक्रम जुने नाशिक परिसरातून सकाळी मिरवणूक उच्च शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग

नाशिक : इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू हजरत इमाम अहमद रजा उर्फ आला हजरत यांच्या १०१व्या स्मृतिदिनानिमित्त जुने नाशिक परिसरातून मिरवणूक (जुलूस) काढण्यात आली. मिरवणूकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. तसेच विविध मशिदींमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले.इस्लामचे थोर अभ्यासक व धार्मिक साहित्यकार आला हजरत यांनी समाजाला दिशा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुराण व हदीसला अनुसरून दर्जेदार लिखाण केले आहेत. त्यांच्या लिखाणातून समाजाला आजही प्रेरणा मिळते. दरवर्षी आला हजरत यांचा स्मृतिदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही मागील दोन दिवसांपासून शहरातील विविध मशिदींमध्ये ‘उरूस-ए-आला हजरत’चा कार्यक्रम पार पडला.दरम्यान, शहर ए खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुने नाशिक परिसरातून सकाळी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत मोठ्या संख्येने समाजबांधव तसेच मदरसा सादिकुल उलूम, गौस-ए-आजमचे विद्यार्थी पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. सहभागी मंडळांकडून आला हजरत यांच्यावर अधारित विविध काव्यपंक्तीचे पठण केले जात होते. मिरवणूकीच्या अग्रभागी नुरी अकादमीचे हाजी सय्यद वसीम पिरजादा, रजा अकादमीचे एजाज रझा मकरानी, मौलाना मुफ्ती महेबुब आलम, मौलाना कारी रईस, मौलाना हाफीज जमाल, मौलाना अजहर, मौलाना वासिक रजा, मौलाना शमशोद्दीन मिस्बाही आदि धर्मगुरू उपस्थित होते. जमात-ए-रझा मुस्तुफा, दावत-ए-इस्लामी, सुन्नी दावत-ए-इस्लामी, शाह सादिक अकादमी या संघटनांचे प्रचारक तसेच इमाम अहमद रजा लर्निंग सेंटरचे पदाधिकारी मिरवणूकीत सहभागी झाले होते.उच्च शिक्षण हाच प्रगतीचा मार्गआला हजरत यांनी उच्च शिक्षणाच्या जोरावर आपल्या ज्ञानाच्या अधारे समाजाला दिशा दाखविणाऱ्या साहित्याची निर्मिती केली. त्यामुळे समाजाने त्यांच्या साहित्यातून उच्चशिक्षणाचा मुलमंत्र लक्षात घेत भावी पिढीला सुसंस्कार द्यावे तसेच उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी हिसामुद्दीन खतीब, वसीम पिरजादा आदिंनी बडी दर्गातील मंचावरून समारोपप्रसंगी बोलताना केले.

टॅग्स :Muslimमुस्लीमIslamइस्लामNashikनाशिक