अक्राळे फाटा- मोहाडी रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:44 IST2021-02-18T22:03:56+5:302021-02-19T01:44:35+5:30
वणी :अक्राळे फाटा ते मोहाडी रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या आयशरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्राळे फाटा- मोहाडी रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार
वणी :अक्राळे फाटा ते मोहाडी रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या आयशरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळू संतू शिंदे (रा. आडगाव सुतार गल्ली) हा आयशर वाहन घेऊन भरधाव वेगाने जात होता. अक्राळे फाटा ते मोहाडी रस्त्यावर त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात महेंद्र क्षीरसागर (२४, रा. मोहाडी) हा दुचाकीस्वार ठार झाला तर त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेल्या पूर्वा तांदळे व सुरेखा तांदळे (रा. पिंपळणारे) या जखमी झाल्या.
अपघाताची खबर न देता फरार झालेल्या आयशर चालक बाळू शिंदे याच्याविरोधात दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.