अक्कलकोट स्वामींच्या पादुकांचे उद्या आगमन
By Admin | Updated: April 26, 2017 01:51 IST2017-04-26T01:50:59+5:302017-04-26T01:51:12+5:30
अक्कलकोट स्वामींच्या पादुकांचे उद्या आगमन

अक्कलकोट स्वामींच्या पादुकांचे उद्या आगमन
नाशिक : श्री अक्कलकोट स्वामींच्या पादुका परिक्रमा पालखीचे आगमन गुरुवारी (दि. २७) सकाळी ९ वाजता नाशिकरोड येथील श्री दत्त मंदिर, शिवाजीनगर स्टॉपजवळ, जेलरोड याठिकाणी होणार आहे.
पादुकांची मिरवणूक सकाळी १० वाजता निघणार असून, दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता भजन, रात्री ८ वाजता शेजारती आदी कार्यक्रम होतील. दि. २८ एप्रिलला पादुकांचे पुढील स्थळी प्रयाण होईल. पादुकांच्या दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ परिवाराने केले आहे.