अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 17:06 IST2021-02-08T17:05:52+5:302021-02-08T17:06:25+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद बांबळेवाडीतील कलाकारांनी समाजातील रूढी, चाली, रीतीनुसार चालत आलेल्या भजनी भारुडाची कला जोपासत आपली परंपरा अबाधित राखली आहे.

Akhand Harinam concludes the week | अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

बांबळेवाडी येथील अखंड हरिनाम सप्तहाच्या सांगतेच्या दिवशी गुरुदत्त सांस्कृतिक भजनी भारुड कार्यक्रमात कला सादर करतांना कलाकार.

ठळक मुद्देबांबळेवाडीतील कलाकारांनी जपली भजनी भारुडाची परंपरा

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद बांबळेवाडीतील कलाकारांनी समाजातील रूढी, चाली, रीतीनुसार चालत आलेल्या भजनी भारुडाची कला जोपासत आपली परंपरा अबाधित राखली आहे.

गावप्रदक्षिणा घालून रथाचे दिंडीत रुपांतर झाल्यानंतर याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत उत्साहात पार पडला. या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बांबळेवाडी येथील गुरुदत्त भजनी भारुड मंडळातील कलाकारांनी आपली कला सादर करत भजनी भारुडाने केली.
सायंकाळी ठीक दहा वाजता सरपंच ताराबाई रतन बांबळे, ग्रामपंचायत सदस्य केशव बांबळे, डॉ. श्रीराम लहामटे यांच्या हस्ते नारळ वाढवून गणरायाच्या ओम नमो रे गजानन या गीताने गणरायाला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सूत्रधार, प्रस्तावना : गणपती स्तवन,आमचे कार्य सिद्धीस जावो असे मनोरंजनात्मक सांस्कृतिक भजनी भारुड या कार्यक्रमात गणपती, शारदा, सरस्वती माता, कृष्ण, सुदाम, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, बागुलबुवा, गौळणी आणि कृष्णाची मावशी यांची सर्व कलाकारांनी वेशभूषा करून मुखवटे परिधान केले केले होते.

व गौळण बोले गौळणीला, माझ्या बाळाचे रूप किती छान जसं बाई पिंपळाचे पान, नंदाच्या घराला जाऊ बारशाला, रडते माझे बाळ तान्हे समजाविते राहिना, दृष्ट काढीते बाळाची, कृष्णा आला रे बागुलबुवा या सर्व वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. टाळ मृदंग, पेटीच्या तालावर कलाकारांनी ठेका धरत गीतकार गायक मंडळींनी गायनातून तर भारुड कलाकारांनी आपल्या भारुडात कलावंतांचा गौळणीच्या सुरात ठेका धरून कलेतून आपली कला सादर केली.
                              दरम्यान पिढीजात पारंपरिक लोप पावलेल्या लोककलेची बांबळेवाडीत या भारुडाच्या रूपाने जोपासना होत आहे. या भारुडात रसिक प्रेक्षक ग्रामस्थांकडून कलाकारांना बक्षिस देऊन दाद देण्यात आली.       

                            सहकारी रामदास भवारी, कैलास भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव बांबळे, बाळू बांबळे, निवृत्ती बांबळे, प्रकाश धादवड, लक्ष्मण भवारी, अशोक मेमाणे, सीताराम भवारी, अर्जुन मेमाणे, दत्तू मेमाणे, नंदू बांबळे, राजाराम भांगे, उत्तम भांगे, दशरथ भवारी, राम धादवड, रवी भवारी, लक्ष्मण धादवड आदी कलाकार तर रामदास मेमाणे, पंढरी भवारी, निवृत्ती मेमाणे, सावळीराम बांबळे, गबाजी भांगे, रामचंद्र मिस्तरी, सीताराम जाखेरे, सोनू मेमाणे, सुभाष मेमाणे, बाळू भांगे, लक्ष्मण भवारी, जयराम भवारी, भिका बांबळे, उमाजी बांबळे आदी गायक भजनी मंडळी या भारुडात काम करतात.

 

Web Title: Akhand Harinam concludes the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.