Akash lantern workshop at Ganadish School, College | गणाधिश स्कूल, कॉलेजमध्ये आकाश कंदील कार्यशाळा

आकाश कंदील बनविण्याच्या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी व शिक्षक.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनी भव्य असा आकाशकंदील तयार करुन तो शाळेच्या प्रांगणात लावला.

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील गणाधीश इंटरनॅशनल स्कूल आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली त्याला चांगला प्रतिसाद लाभला.
दिवाळी आली की लगबग सुरू होते ती आकाशकंदील विकत आणण्याची मात्र जर स्वत: आकाशकंदील तयार केला तर तो आनंद वेगळा असतो, असाच आकाश कंदील स्वत: तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. राजापूर येथील गणाधीश इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजच्या विद्याथ्यांनी प्राचार्य प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्ग शिक्षकाने विद्यार्थ्यांकडून आकाशकंदील तयार करून घेतले.
त्यांनी फाईल बोर्ड पेपरवर पारदर्शक नक्षीदार कागद, कापड ,घोटीव पेपर, लेस, टिकल्या यांचा वापर करून विद्यार्थ्यांना अगोदर वर्गशिक्षकांनी आकाशकंदील करून दाखवले नंतर विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण असे आकाश कंदील तयार केले. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भव्य असा आकाशकंदील तयार करुन तो शाळेच्या प्रांगणात लावला.
 

Web Title: Akash lantern workshop at Ganadish School, College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.