शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

अखेर एअर डेक्कनची विमानसेवा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:51 AM

सामान्य माणसासाठी हवाई स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या माध्यमातून विमानसेवा सुरू करणाऱ्या एअर डेक्कन कंपनीला ती नीट चालविता आली नाही आणि ही सेवा बंद पडली. त्याची गंभीर दखल घेत भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने कंपनीची राज्यातील सेवाच रद्दबातल ठरवली आहे. यासंदर्भात कंपनीला पत्रही देण्यात आले आहे.

ठळक मुद्देविमानपत्तन प्राधिकरणाची नोटीस : नाशिकसह सर्वच ठिकाणी सेवा देण्यात अपयश

नाशिक : सामान्य माणसासाठी हवाई स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या माध्यमातून विमानसेवा सुरू करणाऱ्या एअर डेक्कन कंपनीला ती नीट चालविता आली नाही आणि ही सेवा बंद पडली. त्याची गंभीर दखल घेत भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने कंपनीची राज्यातील सेवाच रद्दबातल ठरवली आहे. यासंदर्भात कंपनीला पत्रही देण्यात आले आहे.कंपनीच्या वतीने उडान अंतर्गत प्रादेशिक जोडणीसाठी अनेक मार्गांवर सेवा देण्याची हमी देण्यात आली होती. एअर डेक्कन कंपनीच्या वतीने नाशिकमध्ये गेल्या वर्षीच्या अखेरीस नाशिक - मुंबई आणि नाशिक- पुणे अशी सेवा देण्यास प्रारंभ झाला होता. ओझर विमानतळावरून ही सेवा सुरू झाल्यानंतर कंपनीने मुंबई-औरंगाबाद, मुंबई-कोल्हापूर, मुंबई- जळगाव, मुंबई - सोलापूर अशा विमानफेºया सुरू करण्यात आल्या होत्या. या सेवेमुळे कमी दरात नागरिकांना मुंबईसारख्या ठिकाणी जोडण्यात येत होते.नाशिकमधून ही सेवा सुरू झाल्यानंतर सात ते आठ दिवस बुकिंगच घेतली नव्हती आणि नंतर मुंबईच्या विमानतळावर टाइम स्लॉट मिळत नसल्याचे निमित्त करून सेवा बंद पडली. यासंदर्भात नवी दिल्ली येथे जाऊन हवाई मंत्रालयासमोर खासदार गोडसे यांनी टाइम स्लॉट मिळवून दिला. परंतु कंपनीला सेवा चालविता आली नाही. मध्यंतरी पुण्याची सेवा बंद करण्यात आली आणि त्यानंतर मुंबईची सेवाही पूर्णत: बंद झाली.केंद्र सरकारच्या या योजनेत नागरिकांना सवलतीच्या दरात हवाई प्रवास करता येणार होता. तसेच कंपनीला निवडलेल्या मार्गावर अन्य स्पर्धक कंपनीची सेवा न देताच मक्तेदारी देण्यात आली होती. त्याचा लाभ कंपनीला उठवता आला नाही.अनामत रक्कमही जप्तमध्यंतरी अनेक मार्गांवर सेवा सुरू झाल्याने कंपनीकडे प्रशिक्षित वैमानिक नसल्याचे तर कधी नवीन वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचे कारण पुढे करण्यात येत होते. परंतु अखेरीस ही सेवा चालविणे क्षमतेच्या पलीकडे गेल्याने सेवाच बंद पडली त्यामुळे शासनाच्या कराराचा भंग झाल्याने भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने २७ जुलैस एअर डेक्कनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर दिले गेले नाही त्यामुळे ही कंपनीची उडानमधील सेवा रद्द करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtourismपर्यटन