दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी राखीव जंगलाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:18 AM2018-02-04T00:18:03+5:302018-02-04T00:18:19+5:30

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी राखीव जंगलाला शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत दोन हेक्टर परिसर खाक झाल्याने परिसरात घबराट पसरली होती.

Ainvantwadi reserve in Jindalala fire in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी राखीव जंगलाला आग

दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी राखीव जंगलाला आग

Next

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी राखीव जंगलाला शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत दोन हेक्टर परिसर खाक झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. अहिवंतवाडी हे अहिवंतवाडी वांजूळपाडा, पवारणीचा पाडा व कोल्हेर गावानजीकच्या जंगलात अचानक आग लागली. तेव्हा वनविभागाने रात्रीची गस्त घालणारे वनक्षेत्रपाल वसंत पाटील व कर्मचारी फिरते पथक यांनी ती लागलेली आग पाहिल्यानंतर चौसाळा परिमंडळ अधिकारी एम.डी. बोरसे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिल्यानंतर सदर अधिकारी व कर्मचारी
तत्काळ घटनास्थळी रवाना झाले व आग लागलेल्या क्षेत्राची पहाणी केली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने लागलेला वणवा त्यांना विझवण्यात यश आले; परंतु ज्याच्या ताब्यात वनक्षेत्र आहे ते अधिकार व कर्मचारी मुख्यालयात रहात नसल्याने त्यांना आग लागलेला वनाचे काय सुख-दु:ख असे परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत.

Web Title: Ainvantwadi reserve in Jindalala fire in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग