कृषिपंप जोडणीचे धोरण लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:50 IST2020-05-13T22:32:05+5:302020-05-14T00:50:11+5:30
नाशिक : राज्यात मार्च २०१८ पर्यंत सुमारे ५० हजार शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी रकमेचा भरणा केला असून, सुमारे दीड लाख शेतकऱ्यांनी नवीन वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज भरलेले आहेत.

कृषिपंप जोडणीचे धोरण लवकरच
नाशिक : राज्यात मार्च २०१८ पर्यंत सुमारे ५० हजार शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी रकमेचा भरणा केला असून, सुमारे दीड लाख शेतकऱ्यांनी नवीन वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज भरलेले आहेत. परंतु, याबाबत आजवर कोणतीही कार्यवाही होऊ शकली नाही. या शेतकºयांना कृषिपंप जोडणीसाठी लवकरच धोरण जाहीर केले जाणार असल्याने शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.
प्रलंबित असलेल्या कृषिपंपांसाठीच्या नवीन वीजजोडणी धोरणाबाबत झालेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊन यांनी कृषिपंप धोरणास अंतिम स्वरूप देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे कृषिपंपाचा रखडलाल प्रश्न मार्र्गी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या प्रदीर्घ बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील शेतकºयांकडून वारंवार विचारणा होत असून, विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होऊन लवकरात लवकर धोरण करण्याची मागणी करण्यात आली होती.
प्रस्तावित धोरणामध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या कृषिपंपांना लघुदाब वाहिनीवरून तर १०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या कृषिपंपांना उच्चदाब विद्युत वितरण प्रणालीवरून वीजजोडणी देण्यात येईल. अशी नवीन जोडणी देताना कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभाग तसेच अन्य विभागांशी समन्वय करून हे धोरण सर्वंकष कसे होऊ शकेल, याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.
याबाबत आवश्यकतेनुसार क्षेत्रीय स्तरावर संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधून सर्वेक्षण करण्याच्या सूचना ऊर्जामंत्र्यांनी दिल्या आहेत.
--------------------------
६०० मीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येईल.
एकाचवेळी पारंपरिक व सौर ऊर्जा या अपारंपरिक स्रोताद्वारे वीजजोडणी देण्याचे धोरण आखण्यात येईल.