वारेगाव येथे शेतीचे साहित्य चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 00:32 IST2021-07-09T00:16:46+5:302021-07-09T00:32:21+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव परिसरात शेतीच्या संबंधित साहित्य चोरीला गेले आहे. सध्या या भागात चोरीचे प्रमाण वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

वारेगाव येथे शेतीचे साहित्य चोरीस
पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव परिसरात शेतीच्या संबंधित साहित्य चोरीला गेले आहे. सध्या या भागात चोरीचे प्रमाण वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
वारेगाव येथील सायाळे रोडकडील समृद्धी महामार्गाच्या शिवारात बाळासाहेब ढमाले यांच्या मालकीचे फवारणी यंत्र , पीटर इंजिन हे गाड्यासह चोरीला गेले आहे. लक्ष्मण पाटील यांच्या मालकीची एक पंधरा हजार किमतीची विद्युत मोटर आणि बाबासाहेब पाटील यांच्या मालकीच्या विहिरीवरील एक पंधरा हजार किमतीची विद्युत मोटार चोरीला गेली आहे. साधारण ४० हजार रुपये किमतीच्या विद्युत मोटारी व शेती संबंधित साहित्य पंधरा दिवसांमध्ये चोरीला गेले असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.