शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांची खंडणी घेताना कृषी सहायक महिलेला मुलासह अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 08:55 IST

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले तब्बल एक काेटी रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बलात्काराचा गुन्हा दाखल करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पिठाच्या विश्वस्तांकडून खंडणी मागणाऱ्या विभागातील कृषी सहायक महिलेस १० लाख रुपये घेताना तिच्या मुलासह पोलिसांनी शनिवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले.     

सारिका सोनवणे आणि मोहित सोनवणे अशी आरोपींची नावे असून  तिने आत्तापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाेघांनाही न्यायालयाने  तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे  पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले. सोनवणे यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एक कोटी ५ लाख  रु. लुटल्याची फिर्याद श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पीठाचे विश्वस्त निंबा शिरसाट यांनी दिली.

काय आहे नेमके प्रकरण?

सारिका व शिरसाट यांची २०१४ मध्ये ओळख झाली होती. दोघेही देवळा तालुक्यातीलच रहिवासी आहेत. संबंधित महिलेने आजारपण, शेती, मुलांचे शिक्षण अशी कारणे सांगून २०१९ मध्ये प्रथम २५ लाख रुपये शिरसाट यांच्याकडून घेतले जानेवारी २०२३ मध्ये महिलेने फिर्यादी शिरसाट यांना भेटून मोबाइलमधील काही व्हिडीओ दाखविले व पुन्हा २० कोटी रुपयांची मागणी करत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 

बदनामीला घाबरून ५० लाख रुपये महिलेस देण्यातही आले. त्यानंतरही तिने १० कोटी ५० लाखांची मागणी केली. तेव्हा मात्र निंबा शिरसाट यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

१० लाखांसह लॅपटॉप जप्तसंशयित आरोपी महिलेच्या घराची  झडती पोलिसांनी घेतली. यात १० लाख रुपये रोख, एक लॅपटॉप, तीन ॲपल मोबाइल, काही कागदपत्रे  जप्त करण्यात आली. 

स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचीही फसवणूक

n२०१८-१९ मध्ये सारिका यांनी स्वामी समर्थ सेवेकऱ्यांकडूनही लाखो रुपये जमा केले.

nपरंतु, मुदत संपूनही पैसै परत केले नाहीत. त्यावेळेस निंबा शिरसाट यांनी सेवेकऱ्यांचे पैसे परत करण्यासाठी सारिका यांना २० लाखांची मदत केली.

nजानेवारी २०२२ मध्ये संशयित सारिका  व तिच्या मुलाने शिरसाट यांना गंगापूर रोडला बोलविले. पैसे न दिल्यास मॉर्फ व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 

सारिका सोनवणे वैद्यकीय रजेवरसारिका सोनवणे या पिंप्री (ता. निफाड) येथे तालुका बीजगुणन केंद्रात कृषी सहायक म्हणून कार्यरत आहेत. ४ ऑक्टोबरपासून त्या वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती उप विभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण