सटाणा तहसीलसमोर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:34 IST2020-01-08T18:34:08+5:302020-01-08T18:34:29+5:30
घोषणाबाजी : विविध मागण्यांचे निवेदन सादर

सटाणा तहसीलसमोर ठिय्या आंदोलन
सटाणा : केंद्र आणि राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला शहर व तालुक्यात प्रतिसाद मिळाला. संपात तालुक्यातील राज्य शासकीय कर्मचारी , राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी सहभागी झाल्याने बँक आणि शासकीय परिसर ओस पडल्याचे चित्र होते. संपाला बागलाण तालुका स्वाभिमानी शेतकरी व सत्यशोधक शेतकरी सभेने पाठींबा देऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना दिले.
तहसिल कार्यालयाच्या बाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या. निवेदनात थकबाकीदार शेतकºयांची संपुर्ण कर्जमाफी करावी, प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करार होऊ नये, शेतकºयांचे संपूर्ण विजिबल माफ करावे, पिक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे शेतकºयांना तात्काळ देण्यात यावे, शेतकºयांना दीडपट हमी भाव द्यावा आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे, उपाध्यक्ष रमेश अहिरे, संघटक कैलास अहिरे, समन्वयक कुबेर जाधव, नारायन जाधव, दत्तू खरे,कडू अहिरे, सयाजी अहिरे, तुषार पाटील, महेंद्र बोरसे, अरूण अहिरे, नरेंद्र अहिरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
बागलाण तालुका सत्यशोधक शेतकरी सभेच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कचेरीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात आदीवासी शेतकरी व जंगल निवासी आदीवासी बांधवांना दुष्कळ भरपाई म्हणून हेक्टरी १३६०० रु पये व अवकाळी नुकसान भरपाई ८ हजार रु पये देण्यात यावे. बागलाण तहसिल अंतर्गत ज्या आदिवासी बांधवांनी वनहक्क दावेदाखल केले आहेत, त्या सर्वांची जीपीएस यंत्रणेमार्फत मोजणी करून दाव्यांना मंजुरी देण्यात यावी.आदी प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचा समावेश होता. यावेळी राज्य संघटक किशोर ढमाले, राज्य उपाध्यक्ष सुभाष काकुस्ते, तालुका अध्यक्ष वामन निकम, आदमन सोनवणे, बापू पवार, जिभाऊ पवार, दिलीप खैरनार, केदू माळी, पुरमल पवार, बाबुलाल पवार , महादू सोनवणे, विलास माळी आदींसह कार्यकर्ते उपास्थित होते.