अंबिकानगरच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:35 IST2020-10-11T00:01:09+5:302020-10-11T00:35:34+5:30
पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील छोटी दुबई व व्यापारी शहर म्हणून प्रचिलत असलेले पिंपळगाव बसवंत शहर स्मार्ट सिटी वाटचाल ...

अंबिकानगरच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार!
पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील छोटी दुबई व व्यापारी शहर म्हणून प्रचिलत असलेले पिंपळगाव बसवंत शहर स्मार्ट सिटी वाटचाल करत असताना परिसरातील अंधश्रद्धाही काही कमी होत नसल्याचे विदारक वास्तव पहावयास मिळत आहे. अंबिकानगर येथील औद्योगिक वसातीत असलेल्या स्मशानभूमीत लिंबू, नारळ, मिरची ठेवली जात असून, अज्ञात व्यक्तींकडून मध्यरात्रीच्यावेळी पूजाविधी केली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शुक्र वारी मध्यरात्री सत्तर वर्षांवरील एक वृद्धा स्मशानभूमीत दोरा बांधून फुले वाहून लिंबू,मिरची ठेवून शवदाहिनीच्या जागेवर पूजाविधी करताना येथील नागरिकांनी पाहिली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मान झाले आहे.औद्योगिक वारसा लाभलेल्या पिंपळगाव शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. मात्र दुसरीकडे स्मशानभूमी नारळ व लिंबानी सजवलेली दिसल्याने अंधश्रद्धेच्या घटनेची चर्चा शहरात रंगली आहे. नागरिकांमध्ये अंधश्रद्धा फोफावत चालली असल्याचे पाहयला मिळते. विद्यार्थ्यांना हसत खेळत विज्ञानाचे धडे दिले जात असतानाच अंधश्रद्धेबाबतची ही विदारक मानिसकता दूर सारण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे.
लिंबू मिर्ची प्रथा बंद होणार कधी?
वाहनांना लिंबू-मिरची, बिब्बा बांधून अंधश्रद्धेचे दर्शन घडविले जाते. दर शनिवारी अशा प्रकारे लिंबू मिरची वाहनांना लावण्यात येते. तर जुने झालेले लिंबू मिरची काढून ते भररस्त्यात, तीन रस्ते एकत्र येणार्या जागेवर फेकले जातात. यामुळे ही अंधश्रद्धेची प्रथा कधी बंद होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.