कळवण : बुधवारी रात्री गस्त घालत असताना पोलिसांनी संशयित पिकअप वाहनाचा पाठलाग करून एकलहरे चौफुलीवर सदर वाहन अडविले असता मोटारसायकलसह तलवार, कोयता असा आठ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. मात्र चालकासह संशयित तिघे फरार झाले आहेत. बुधवारी रात्री गस्त घालत असताना हवालदार परदेशी व चालक घरटे यांना गणेशनगर भागात स्टेट बँक कॉर्नरपासून पिकअप (क्र . एमएच १५ एफव्ही ६३७३) भरधाव वेगाने जाताना दिसून आली. संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून एकलहरे चौफुलीजवळ पिकअप थांबविली असता, गाडी सोडून चालकासह तीन इसम पळून गेले. पिकअपमध्ये धारधार शस्त्र, हत्यारांसह मोटारसायकल आढळून आली. वाहनावरील नावावरून कळवण पोलिसांनी मूळ मालकाचा शोध घेतला असता सदर वाहन गण्या ऊर्फ सतीश बारकू शिंदे (रा. मालसाणे, ता. चांदवड. सध्या रा. कनाशी) व त्याचे दोन साथीदार असल्याचे समजले. जप्त केलेली मोटरसायकल देवळा येथून चोरल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी अप्पर अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राहुल फुला, पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधोर, पोलीस हवालदार परदेशी आदींचे तपास पथक रवाना करण्यात आले आहे. मोटारसायकल चोरी करणारे रॅकेट तालुक्यात कार्यरत असून, चोरलेल्या मोटारसायकल व मोटारसायकलचे स्पेअर पार्टची विक्र ी केली जात असल्याने गुन्हेगाराकडून चोरीस गेलेल्या मोटारसायकलींचा शोध घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे जितेंद्र वाघ यांनी केली.
कळवणला हत्यारे हस्तगत संशयित फरार : मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:26 IST
कळवण : बुधवारी रात्री गस्त घालत असताना पोलिसांनी संशयित पिकअप वाहनाचा पाठलाग करून एकलहरे चौफुलीवर सदर वाहन अडविले असता मोटारसायकलसह तलवार, कोयता असा आठ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
कळवणला हत्यारे हस्तगत संशयित फरार : मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश होणार
ठळक मुद्देएकलहरे चौफुलीजवळ पिकअप थांबविली मोटरसायकल देवळा येथून चोरल्याचे निष्पन्न