शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ललित नंतर आता सनी पगारे नवा ड्रग्जमाफिया! सोलापुरात 'उद्योग', नाशकात बाजार; पोलिसांनी केला भांडाफोड

By अझहर शेख | Updated: October 28, 2023 14:46 IST

बंद पडलेल्या कारखान्यात एमडी निर्मिती...

नाशिक : राज्यभरात गाजत असलेल्या संशयित ड्रग्जमाफिया ललित पानपाटीलच्या प्रकरणानंतर एक धक्कादायक असे नवीन एमडी ड्रग्जचे प्रकरण नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या विशेष टास्क फोर्सच्या सोलापूरमधील कारवाईनंतर समोर आले आहे. नाशिक पोलिसांच्या हाती लागलेला ड्रग्जमाफिया संशयित सनी अरुण पगारे हा चक्क सोलापूरात एमडीचा कारखाना चालविला होता, अशी माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिकच्या तीन पथकांनी सोलापूरातील मोहोळ येथे जाऊन हा कारखाना उद्धवस्त करत ६ किलो ६०० ग्रॅम इतका एमडी पावडरचा साठा जप्त केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

नाशिक शहर पोलिसांनी ७सप्टेंबर रोजी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सामनगाव रस्त्यावर संशयित संजय गणेश शर्मा यास १२.५ग्रॅम एमडी पावडरची विक्री करताना रंगेहात ताब्यात घेतले होते. त्या गुन्ह्याचा तपास पुढे अमली पदार्थविरोधी पथकाने हाती घेत शृंखला शोधण्यास सुरूवात केली. साकीनाका पोलिसांच्या शिंदे गावातील कारवाईनंतर अंकुश शिंदे यांनी अमली पदार्थविरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट-१च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संयुक्तिक विशेष टास्क फोर्स स्थापन करून गुन्ह्याचा सखोल तपास करत मुळाशी जाऊन छडा लावण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ, दिवाणसिंग वसावे, हेमंत फड यांच्या पथकाने शर्माला एमडी देणारे संशयित अर्जुन पिवाल, मनोज गांगुर्डे, सनी पगारे, सुमीत पगारे यांच्यासह मुंबईतून भुषण उर्फ राजा माेरे यांच्या मुसक्या बांधल्या. 

या टोळीने नाशिकमध्ये एमडी ड्रग्जविक्रीचे जाळे विणले होते. पोलिस कोठडीत त्यांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडून तीन ते साडेतीन किलो एमडी पावडर जप्त केली. त्यांनी ही पावडर कोठून व कशी आणली याचा शोध घेताना पोलिसांना कारखाना चालविला जात असल्याची माहिती मिळाली. हा कारखाना नाशिकमध्ये आहे, की नाशिकच्याबाहेर हे मात्र लवकर स्पष्ट होत नव्हते. विशेष पथकाने परिश्रम घेत तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सनी पगारेला ‘खाक्या’ दाखिवला. त्यानंतर त्याने सोलापूर कारखान्याची कबुली पोलिसांकडे दिली.

बंद पडलेल्या कारखान्यात एमडी निर्मितीमोहोळ येथे एक बंद पडलेली स्वामी समर्थ नावाची रासायनिक कंपनी भाडेतत्वावर घेऊन त्यामध्ये एमडी ड्रग्ज निर्मितीचा ‘उद्योग’ या पगारेने चालविला असल्याची खात्री पटल्यानंतर तीन पथके सोलापूरच्यादिशेने रवाना झाली. शु्क्रवारी सकाळपासून पथकाने मोहोळ भागात कारवाई करत तेथून ६ किलो ६००ग्रॅम शुद्ध एमडी पावडरसह एमडी सदृश्य १४ किलो २३०ग्रॅम पावडर जप्त केली. तसेच कारखाना उभा करण्यास हातभार लावणारा नाशिकचा संशयित मनोहर पांडुरंग काळे यास अटक केली. तसेच सोलापूरातूनसुद्धा एका संशयिताला चौकशीसाठी या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात दोन संशयित निष्पन्न झाले असून ते फरार असून पोलिस त्यांना शोध घेत आहेत. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थmafiaमाफियाNashikनाशिकSolapurसोलापूरMIDCएमआयडीसीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी