अखेर ‘त्या’ रस्त्याची झाली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 02:00 IST2019-07-14T02:00:07+5:302019-07-14T02:00:29+5:30

त्र्यंबक तालुक्यातील वरसविहीर ते बोरीपाडा रस्त्याच्या झालेल्या कामाचे बिल काढून फसवणूक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांनी केलेल्या मागणीप्रमाणे चौकशी समितीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे.

After all, the survey was done on the road | अखेर ‘त्या’ रस्त्याची झाली पाहणी

वरसविहीर ते बोरीपाडा येथील रस्त्याची पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करताना अधिकारी.

ठळक मुद्देवरसविहीर-बोरीपाडा; काम बांधकाम विभागाचे पैसे जिल्हा परिषदेचे

वेळुंजे : त्र्यंबक तालुक्यातील वरसविहीर ते बोरीपाडा रस्त्याच्या झालेल्या कामाचे बिल काढून फसवणूक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांनी केलेल्या मागणीप्रमाणे चौकशी समितीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. वरसविहीर ते बोरीपाडा हा १३६० मीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला असताना जिल्हा परिषद ठेकेदाराने तो आपण केल्याचे भासवून तब्बल १५ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांनी ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिला.
प्रत्यक्ष झालेला रस्ता ६८० मीटरचे दोन टप्पे १३६० मीटरचा असून, त्याची रूंदी ३.७५ मीटर आहे. प्रत्यक्ष जागेवर मोजमाप केले असता तो ३.७५ ते .८० मीटर असा आढळून आला आहे. जिल्हा परिषदेने बिल अदा केलेल्या रस्त्याची रूंदी तीन मीटर आहे. रस्त्याचे कामदेखील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मानांकाप्रमाणे झालेले दिसून येत होते. या कामावर दावा सांगणाऱ्या ठेकेदाराने मात्र हा रस्ता आपण केल्याचे सांगितले व सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता हा नाही असा दावा केला. जागेवर ग्रामस्थदेखील हजर होते, त्यांनी आपण मजुरी केल्याचे सांगितले व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ठेकेदाराने आपल्याला मजुरी दिल्याचे नमूद केले. सार्वजनीक बांधकाम खात्याचे उपअभियंता यांनी कामाच्या वेळेस असलेल्या छायाचित्र सादर केली. दरम्यान जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता यांना मात्र हे काम त्यांनीच केल्याचे पुराव्यानिशी दाखविता आले नाही.

बांधकाम विभागाची फाईल सर्वसाधारण सभेत
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत रूपाली माळेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची संबंधित रस्त्याच्या कामाची कागदपत्रे असलेली फाईल सादर केली. त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी चौकशी समिती स्थापन करून अहवाल मागितला होता. तथापि चौकशी समिती वरसविहीर येथे पाहणीसाठी आली नाही, तेव्हा ग्रामस्थ नाराज झाले होते. याबाबत माळेकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर शुक्र वारी (दि.१२) दुपारी चार वाजेच्या सुमारास चौकशी समिती प्रत्यक्ष मोजमाप करण्यासाठी हजर झाली.


दरम्यान अतीरिक्त मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली.जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विनायक माळेकर यांनी आदिवासी जनतेच्या विकासासाठी असलेल्या निधीचा अपहार झाला आहे. त्याची शहनीशा करून न्याय मिळावा अशी मागणी केली.
याबाबत जिल्हा परीषदेचे अतीरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी व चौकशी समितीच्या प्रमुख यांना विचारणा केली असता त्यांनी या कामा बाबत ताबडतोब अनुमान काढता येणार नाही त्या करीता कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगीतले .

Web Title: After all, the survey was done on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.