शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

अखेर पाटील यांच्यासह आंदोलकांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 01:06 IST

बेकायदा धार्मिक स्थळांना संरक्षण द्यावे यांसह अन्य मागण्यांसाठी गेल्या मंगळवारपासून महापालिकेच्या सभागृहातच ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांचे पद तडकाफडकी काढून घेतल्यानंतर लगेचच पोलीस बळाचा वापर करून सत्तारूढ भाजपाने आंदोलन चिरडले आहे.

नाशिक : बेकायदा धार्मिक स्थळांना संरक्षण द्यावे यांसह अन्य मागण्यांसाठी गेल्या मंगळवारपासून महापालिकेच्या सभागृहातच ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांचे पद तडकाफडकी काढून घेतल्यानंतर लगेचच पोलीस बळाचा वापर करून सत्तारूढ भाजपाने आंदोलन चिरडले आहे. शुक्रवारी (दि.२८) राजीव गांधी भवनात प्रचंड पोलीस ताफा नेण्यात आला आणि पाटील यांना उचलून घेण्याची तयारी करण्यात आली. मात्र पोलिसांबरोबर जाण्यास ते तयार झाल्यानंतर त्यांना तसेच राष्टÑवादी कॉँग्रेसचे गटनेता गजानन शेलार, मनसेचे माजी गटनेता सलीम शेख आणि भाजपा नगरसेवक रवींद्र धिवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी मठ मंदिर बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र ते बाजूला झाले. तथापि, येत्या निवडणुकीत भाजपाला नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.महापालिकेतील भाजपातील पाटील यांच्या विरोधात नाराजी वाढीस लागली होती. पक्षाचे आदेश न जुमानता पाटील हे वेळोवेळी पक्षश्रेष्ठींनाच आव्हान देतात अशाप्रकारच्या तक्रारी त्यांच्या विरोधात करण्यात येत होत्या. त्यातच मंगळवारी (दि.२५) महासभेत त्यांनी धार्मिक स्थळांना नियमित करावे, महापालिकेच्या मिळकतींचे सील खुले करून त्यांना दहा रुपये चौरस मीटर दराने भाडे आकारावे, सेंट्रल किचन योजना रद्द करावी व बचत गटांकडेच काम ठेवावे तसेच सिडकोतील बांधकाम मंजुरीसाठी जुनेच नियम वापरावे अशा प्रकारच्या मागणीचे पत्र पाटील यांनी दिले होते. त्यावर अपेक्षित निर्णय झाला नसल्याचा त्यांचा दावा होता यामुळे त्यांनी महापौरांच्या पीठासनसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांना राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार आणि मनसेचे सलीम शेख तसेच भाजपा नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी साथ दिली. गेली तीन दिवस हे आंदोलन सुरू असले तरी बुधवारी (दि.२६) पाटील यांच्या विरोधात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी गेल्या होत्या. सभागृह नेता पदावर असताना त्यांचे आंदोलन हटविल्यास पक्षाची अधिक नकारात्मक चर्चा होईल हे लक्षात घेऊन प्रथम गुरुवारी रात्री सभागृह नेतेपदी सतीश सोनवणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी (दि.२८) दुपारी अपेक्षेनुसार बळाचा वापर करून आंदोलन संपविण्याची तयारी करण्यात आली.शुक्रवारी दुपारी गुन्हे शाखेचे अधिकारी व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर व संजय सांगळे, उपनिरीक्षक लोंढे, नारखेडे, राठोड, बागुल तसेच अन्य वरिष्ठ अधिकाºयांनी महिला पोलीस पथक तसेच विशेष पथक महापालिकेत आणले. या पथकाने सभागृहातील कार्यकर्ते आणि आंदोलक समर्थकांना बाहेर काढले. महापालिकेच्या वतीने नगरसचिवांनी दिलेले पत्र पाटील यांना देण्यात आले. त्यात सभागृहातील आंदोलन बेकायदेशीर असल्याचा उल्लेख होता. या पत्राचे वाचन केल्यानंतर सहायक पोलीस आयुक्तांनी पाटील यांना आंदोलन समाप्त करा, असे दरडावले. पाटील यांनी त्यांची बाजू मांडली.आम्ही चोर नाहीत, लोकप्रतिनिधी आहोतपोलिसांनी सभागृहात शिरल्यानंतर सहायक पोलीस आयुक्तांनी आंदोलकांना दरडावण्याची भाषा केली. तुमचे काय म्हणणे आहे ते पोलीस ठाण्यात येऊन सांगा, असे त्यांनी सांगितल्यानंतर पाटील संतापले, आम्ही चोर नाही, लोकप्रतिनिधी आहोत, त्याचा विचार करून बोला असे त्यांना समजावले. लोकांच्या प्रश्नांवर आम्ही अधिकृतरीत्या प्रश्न दिले आणि सभागृहात आंदोलन दिले. आंदोलनाचा त्रास होत होता, तर महापौरांनी सुरक्षारक्षकांना सांगून आम्हाला हटविले असते आणि पदही निलंबित केले असते, असे शेलार यांनी सांगितले. संपूर्ण बाजू मांडल्यानंतरही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेव्हा तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व करत आहात हे मला सर्व माहिती आहे, असे पाटील यांनी पोलीस अधिकाºयांना ऐकवलेच, परंतु आमचे आंदोलन कायदेशीर होते तुम्हीच बेकायदेशीर काम करीत आहात, असा आरोपही त्यांनी केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliceपोलिसBJPभाजपा