महाराष्टÑात दुर्घटना घडल्यानंतर राज्य सरकार कोचींग क्लाससाठी कायदा करणार का?
By संजय पाठक | Updated: May 26, 2019 00:17 IST2019-05-26T00:11:41+5:302019-05-26T00:17:06+5:30
नाशिक- सुरत येथील एका खासगी कोचींग क्लासेला लागलेल्या आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी इमारतीतून बाहेर पडण्याची कोणतीही संधी नसल्याने विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या घेतल्या त्यात वीस जणांना जीव गमवावा लागला आहे. केवळ सुरतच नाही महाराष्टÑात देखील अशाप्रकारचे शेकडो क्लास असून त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे किंवा नाही हे कोणाला माहिती नाही. इतकेच नव्हे तर खासगी कोचींग क्लासेससाठी राज्य सरकार कायदा करणार असला तरी गेल्या किमान वर्षभरापासून हा कायदा विधानसभेत मंजुरीसाठी पडून आहे. सुरत सारखी एखादी दुर्घटना घडून मुलांचा बळी गेल्यानंतर सरकार कायदा करणार काय असा प्रश्न केला जात आहे.

महाराष्टÑात दुर्घटना घडल्यानंतर राज्य सरकार कोचींग क्लाससाठी कायदा करणार का?
संजय पाठक, नाशिक- सुरत येथील एका खासगी कोचींग क्लासेला लागलेल्या आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी इमारतीतून बाहेर पडण्याची कोणतीही संधी नसल्याने विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या घेतल्या त्यात वीस जणांना जीव गमवावा लागला आहे. केवळ सुरतच नाही महाराष्टÑात देखील अशाप्रकारचे शेकडो क्लास असून त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे किंवा नाही हे कोणाला माहिती नाही. इतकेच नव्हे तर खासगी कोचींग क्लासेससाठी राज्य सरकार कायदा करणार असला तरी गेल्या किमान वर्षभरापासून हा कायदा विधानसभेत मंजुरीसाठी पडून आहे. सुरत सारखी एखादी दुर्घटना घडून मुलांचा बळी गेल्यानंतर सरकार कायदा करणार काय असा प्रश्न केला जात आहे.
खासगी शिकवणी किंवा कोचींग क्लासेस आता शैक्षणिक जीवनातील महत्वाचा घटक ठरला आहे. राज्यात शेकडो कोचींग क्लासेस असून त्यांची नोंद राज्यशासनाकडे किंवा शिक्षण खात्याकडे नाही. कोणत्याही इमारतीत कोणीही व्यक्ती क्लासेस सुरू करू शकतो. त्याला ना शैक्षणिक पात्रतेचे बंधन ना अन्य कोणते नियंत्रण. नाशिकसारख्या ठिकाणीच अशाप्रकारचे सुमारे अडीच हजार क्लासेस आहेत. लाखो मुले या पर्यायी शिक्षण व्यवस्थेचा लाभ घेत असतात. शाळा महाविद्यालयांपेक्षा क्लास महत्वाचे ठरू लागले असून त्यांचे शुल्क इंटरनॅशनल स्कूलच्या तोडीचे म्हणजेच लाखो रूपयांत आहे. परंतु राज्य शासनाकडून त्याचे कोणतेही नियमन होत नाही.
काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने खासगी कोचींग क्लासेससाठी कायदा करण्याचे ठरविल्यानंतर त्याला राज्यभरातील कोचींग क्लास चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या कायद्याच्या प्रारूपानुसार क्लासचालकांची नोंदणी होईलच परंतु ज्या ठिकाणी क्लास चालू आहे, तेथे मुबलक जागा, सीसीटीव्ही, पाणी पुरवठा, वाहनतळ आणि अन्य सुरक्षा नियमांचा अंतर्भाव असणार आहे विधी मंडळाच्या पटलावर हा प्रस्ताव पडून असून गेल्या तीनेक वर्षात तो मंजुर झालेला नाही. त्यामुळे तो नक्की कधी होणार आणि पालकांना सुरक्षीततेची हमी कधी मिळणार असा प्रश्न केला जात आहे. सुरतमध्ये घडलेल्या दुर्घटनेची महाराष्टÑात पुनरावृत्ती झाल्यानंतर कायदा होणार काय असा देखील प्रश्न केला जात आहे.