शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

कांदा उत्पादकांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:31 PM

येवला : यंदा अतिरिक्त पावसाच्या तडाख्याने रोपे नष्ट झाल्यामुळे कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यात वाढलेले तापमान यामुळे यंदा उन्हाळ ...

ठळक मुद्देउत्पादनात घट : केंद सरकारच्या निर्यात धोरणावर भवितव्य अवलंबून

येवला : यंदा अतिरिक्त पावसाच्या तडाख्याने रोपे नष्ट झाल्यामुळे कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यात वाढलेले तापमान यामुळे यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ होऊनही उत्पन्न घटल्याने थोडा अधिक दर मिळूनदेखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परवड होण्याची शक्यता बोलली जात आहे. शासनाच्या पूरक निर्यात धोरणावर शेतकरी अवलंबून असल्याचे सध्याचे चित्र आहे.यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लावलेली सुमारे ८० टक्के रोपे सडली. त्यामुळे शेतकºयांनी पुन्हा रोपे टाकली. पहिल्या नोव्हेंबरच्या टप्प्यातील उन्हाळ कांद्याची रोपे गेल्याने शेतकºयांचा पैसा वाया गेला. सुरु वातीला अतिरिक्त पावसाचा फटका झेलून ज्या २० टक्के शेतकºयांची रोपे वाचली, त्या शेतकºयांचा कांदा आता बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ लागला आहे. त्यांना साधारण दोन हजार ते २४०० रु पये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. ज्या शेतकºयांची रोपे सडली, त्यांनी पुन्हा रोपे तयार करण्यात दीड महिन्याचा कालावधी गेला. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये उशिरा उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. त्यातच कायम ढगाळ वातावरण आणि त्यामुळे झालेला औषधांचा झालेला वाढीव खर्च याशिवाय उशिरा लागवडीमुळे कांदा पोसला नाही. वजनातदेखील कमी भरणार आहे. उशिरा कांदा लागवडीची प्रतवारी साठवणी योग्य चांगली राहील का? हा प्रश्न आहे.तापमानात सध्या चांगलीच वाढ होत आहे. ३२ अंशांच्या पुढे तापमान चालले आहे. त्या कांद्याच्या साठवण क्षमतेवर परिणाम करणारे तापमान शेतकºयांना सतावू लागले आहे. उत्पादनदेखील ५० ते ६५ टक्के निघण्याची शक्यता आहे. तरीही दरवर्षीपेक्षा तुलनेत कांदा उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेने यंदा कांदा उत्पादक शेतकºयांना दोन पैसे मिळण्याची आशा आहे. यंदा पुन्हा कांद्याने शेतकरी हसणार असल्याची चिन्हे दिसत आहे. यंदा उन्हाळ कांद्याला १८०० ते २००० प्रतिक्विंटल दर जरी मिळाला तरी साठवण करण्याकडे शेतकºयाचा कल कमी राहण्याची शक्यता आहे. उशिरा लागवड झालेला कांदा एप्रिल अखेर बाजारात येईल.दरम्यान निर्यात शेतकºयांना मारक ठरणार नाही याची शासनाला काळजी घ्यावी लागेल. देशांतर्गत कांदा मागणी साधारण असताना कांदा निर्यात धोरण प्रोत्साहन देणारे असावे, त्यामुळे शेतकºयाच्या हाती दोन पैसे येतील आणि सुखाचे दोन घास खाता येतील.उन्हाळ कांद्याला हवा दरगुरु वारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मुख्य बाजार आवारासह अंदरसूल उपबाजार आवारात १२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांदा प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल २०५१, सरासरी १८७० रुपये असल्याचे चित्र दिसले. कांद्याचे असेच दर टिकून राहिले तर उन्हाळ कांद्याला किमान २५०० ते २८०० रु पये दर मिळाला तरी शेतकरी समाधानी असेल आणि कांदा साठवणीच्या भानगडीत फारसा पडणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.कांदा निर्यात धोरणात आता शासनाने शेतकरी हित पाहून निर्यात खुली करावी. त्यामुळे शेतकºयांच्या कांद्याला दर मिळेल. शेतकºयांना मारक धोरण केंद्र शासनाने राबवू नये.- उत्तम पुंडकांदा उत्पादक, पारेगाव

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा