शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचलला टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
3
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
4
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
5
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
6
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
7
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
8
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
9
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
10
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
11
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
12
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
13
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
14
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
15
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
16
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
17
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
18
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
19
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
20
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात बीएससी पावडरमध्ये भेसळ

By admin | Updated: January 11, 2017 22:50 IST

तक्रार : मुख्याधिकाऱ्यांना युवकांतर्फे निवेदन सादर

येवला : नगरपालिकेच्या वतीने डास निर्मूलनासाठी वापरण्यात येणाऱ्या बी.एस.सी. पावडरीत रांगोळीसदृश माती भेसळ असल्याची तक्रार काही युवकांनी केली असून, यासंबंधी पालिकेने चौकशी करून संबंधितांना जाब विचारावा आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नये, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या नावे असणारे निवेदन उपमुख्याधिकारी एजाज शेख यांनी स्वीकारले.  येवला शहरात अस्वच्छतेमुळे झालेल्या डासांचे निर्मूलन करण्यासाठी पालिका ठिकठिकाणी बी.एस.सी. पावडर टाकत आहे. सोमवारी येथील केशवराव पटेल मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या महिला व पुरुष प्रसाधनगृहात स्वच्छतेसाठी बीएससी पावडर टाकण्यात आली. परंतु मोठ्या प्रमाणावर पावडर टाकूनदेखील वास का येत नाही म्हणून कुतूहलापोटी काही तरु णांनी संबधित पावडरचे निरीक्षण केले असता त्या पावडरचा वास येत नाहीच पण पावडरमध्ये रांगोळीसारखे काहीतरी भेसळ असल्याचे त्यांना आढळून आले. या युवकांनी पावडरचा नमुना घेतला व थेट पालिका कार्यालयात जाऊन ती पावडर पाण्यात टाकून प्रात्यक्षिक देखील दाखवले. पाण्यात टाकलेली पावडर थेट तळाशी गेल्याने पावडरमध्ये रांगोळी भेसळ असल्याचे प्रथमदर्शनी युवकांच्या नजरेस आले. त्यामुळे आरोग्य विभागातील शिल्लक असलेल्या बी.एस.सी. पावडरच्या नमुन्याची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते अमोल गायकवाड, दीपक पाटोदकर, राहुल सुताने, दत्तात्रय कापसे, अनिल खरोटे, शंकर चासकर, विजय म्हस्के, राजेंद्र गांगुर्डे, संतोष गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)