शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

११ फ्रेब्रुवारीपासून आरटीईसाठी प्रवेशप्रक्रिया, ११, १२ मार्चला लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 4:04 PM

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर पात्रताधारक पालकांना त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी काढण्याची प्रक्रिया चालणार असून, या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ मार्च ते ३ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करून संधी मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.  

ठळक मुद्दे आरटीईसाठी ११ फ्रेब्रुवारीपासून प्रवेश अर्ज करण्याची संधी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १५ दिवसांच्या कालावधीत११ व १२ मार्चला लॉटरी ; ३ एप्रिलपर्यंत प्रवेशाची संधी

नाशिक : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर पात्रताधारक पालकांना त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी काढण्याची प्रक्रिया चालणार असून, या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ मार्च ते ३ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करून संधी मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.  आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या शाळांना स्वयंचलितरीत्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया दि.२१ जानेवारीपासून सुरू झाली असून, सोबतच गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून नवीन नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणीही सुरू झाली आहे. ही पडताळणी प्रक्रिया ६ फेब्रुवारीर्यंत चालणार असून, त्यानंतर ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी व १६ मार्च ते ३ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करून संधी मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. दरम्यान, लॉटरीतून संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर प्रतीक्षा यादीनुसार चार टप्प्यांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. यातील पहिला टप्पा १३ ते १८ एप्रिल असा पाच दिवसांचा, दुसरा टप्पा २४ ते २९ फेब्रुवारी, तिसरी यादी ६ ते १२ मे व चौथी यादी १८ ते २२ मे या कालावधीत राबविली जाणार असून, प्रत्येक टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पाच दिवसांचा कालावधी मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. 

एकच लॉटरी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाºया प्रवेशप्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून, यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत केवळ एकच लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी संधी मिळालेल्या पालकांना दिलेल्या मुदतीत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश निश्चित करणे अनिवार्य असून, निश्चित मुदतीनंतर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी चार टप्प्यात प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.   

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी