उमराणे बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 18:52 IST2020-08-27T18:49:23+5:302020-08-27T18:52:34+5:30

उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा शासननियुक्त प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असुन या संचालक मंडळात एकुण १९ संचालकांचा समावेश आहे. मुख्य प्रशासक म्हणून सोनाली देवरे यांची निवड करण्यात आली.

Administrative Board of Directors on Umrane Market Committee | उमराणे बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ

सोनाली देवरे

ठळक मुद्देमुख्य प्रशासकपदी सोनाली देवरे यांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा शासननियुक्त प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असुन या संचालक मंडळात एकुण १९ संचालकांचा समावेश आहे. मुख्य प्रशासक म्हणून सोनाली देवरे यांची निवड करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपूर्वी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर या समितीवर प्रशासकांची नेमणुक करण्यात आली होती. या बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ नेमण्यात यावे यासाठी प्रयत्न केल्यानंतर या मागणीस मान्यता मिळाली असुन गुरु वारी (दि.२७) दुपारी तशा आशयाचे पत्र बाजार समिती कार्यालयास प्राप्त झाले. यात एकुण १९ प्रशासकीय संचालक मंडळात बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांच्या पत्नी सोनाली देवरे, देवानंद वाघ, सचिन देवरे, दिलीप ठाकरे, केशव शेवाळे, गणेश गांगुर्डे, संजय देवरे, पोपट खैरनार, नामदेव खैरनार, काशिनाथ अहिरे, विश्वास वाघ, मनिराम अहिरे, गौरव खैरनार, मनिषा ठाकरे, शोभा पाटील, अनिता बस्ते, प्रविण देवरे, महेंद्र मोदी, दिपक अहेर यांचा समावेश आहे.
दुपारी सर्व प्रशासकीय संचालक बाजार समिती कार्यालयात एकत्र आले. त्यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विलास देवरे, यशवंत शिरसाठ आदिंसह कांदा व्यापारी, पीसरातील गावातील नागरीक उपस्थित होते.
 

Web Title: Administrative Board of Directors on Umrane Market Committee