आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाली विमानतळ पाहण्याची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:30 IST2018-02-22T13:30:39+5:302018-02-22T13:30:55+5:30
पेठ - स्वातंच्याच्या ७० वर्षानंतरही आपल्या गावात साध्या लालपरीचेही दर्शन न घेतलेल्या पेठ तालुक्यातील धानपाडा व बिलकस परिसरातील १०४ विद्यार्थ्यांना ओझरच्या विमान कारखान्यास भेट देऊन विमान तयार करण्याच्या प्रक्रियेसह विमानतळ पाहण्याची अनोखी संधी मिळाली.

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाली विमानतळ पाहण्याची मेजवानी
पेठ - स्वातंच्याच्या ७० वर्षानंतरही आपल्या गावात साध्या लालपरीचेही दर्शन न घेतलेल्या पेठ तालुक्यातील धानपाडा व बिलकस परिसरातील १०४ विद्यार्थ्यांना ओझरच्या विमान कारखान्यास भेट देऊन विमान तयार करण्याच्या प्रक्रियेसह विमानतळ पाहण्याची अनोखी संधी मिळाली. ओझरच्या एचएएल कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने आदिवासी शाळांमधील मुलांना कारखान्याची भेट घडवून आणली. प्रत्येक मुलास शैक्षणिस कीट देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मुख्य संघटक अशोक कदम, दिपक पाटील, भूषणदास, राजेंद्र पाटील, कपिल निफाडकर, तेजस चव्हाण, ज्ञानेश्वर खालकर, नामदेव गायकवाड,धानपाडयाचे सरपंच रमेश दरोडे, त्र्यंबक बोरसे, शिक्षक गोवर्धन टोपले, परशराम पाडवी, जिभाऊ सोनजे यांचेसह एचएएल चे अधिकारी , कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.