आदिवासी कोळी समाजाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:21 IST2019-01-29T00:21:02+5:302019-01-29T00:21:22+5:30
संविधानिक अधिकार असूनही महाराष्टÑातील अनुसूचित जमातींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आदिवासी कोळी समाजाचे धरणे आंदोलन
नाशिकरोड : संविधानिक अधिकार असूनही महाराष्टÑातील अनुसूचित जमातींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या वतीने सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अनुसूचित जमातींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने धरणे आंदोलन करण्यात आले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संविधानिक अधिकार असूनही महाराष्टÑातील कोळी समाजाच्या जाती आणि उपजाती यांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळत नाही. जात प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडून नेहमीच बेकायदेशीर व घटनाबाह्य वागणूक दिली जात असून, त्यांचे जमातीचे दाखले कोणत्याही पुराव्याचा विचार न करता सरळ रद्दबातल केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. निवेदनांवर समितीचे जिल्हा अध्यक्ष किसन सोनवणे, अर्जुन सरपने, अण्णा मेने, अश्विनी घाणे, मंदा गायकवाड, विजय दरेकर, दीपक मोरे, आदीच्या सह्या आहेत.