Adequate supply of oxygen, remedicivir | ऑक्सिजन, रेमडेसिविरचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा

ऑक्सिजन, रेमडेसिविरचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा

शहरातील कोराेनाबाधितांवरील उपचाराच्या अनुषंगाने सोमवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात आयएमए प्रतिनिधींबरोबर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठक घेतली. यावेळी नाशिककरांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही आयएमएच्या वतीने आश्वासन देण्यात आले.

रेमडेसिविर टंचाई जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर औषधांची शिफारस योग्य प्रकारे केली जात आहे किंवा कसे, हे डॉक्टरांनी काळजीपूर्वक तपासले तर अनावश्यक मागणी दूर होईल तसेच योग्य त्या रुग्णांना पुरवठा करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचा पाठपुरावा करण्याचे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये प्रबोधनाचे आश्वासनही आयएमएच्या वतीने देण्यात आले.

वैद्यकीय व्यावसायिकांना येत असलेल्या अडचणींकडे असोसिएशनने लक्ष वेधले आणि रेमडेसिविर तसेच ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणात केल्यास गैरप्रकारांना आळा बसेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कोट...

जिल्हा प्रशासनाची यंत्रणा व डॉक्टरांची यंत्रणा एकत्रितरीत्या या औषधांची शिफारस, वापरण्यात तसेच वितरण या सगळ्या बाबींवर लवकरच प्रभावी नियंत्रण आणेल.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Web Title: Adequate supply of oxygen, remedicivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.