शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पर्वणीसाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा

By admin | Updated: September 11, 2015 00:46 IST

दक्षता सुरक्षेची : एसआरपी, आरएएफ, बीएसएफच्या जवानांनी ठोकला तळ

नाशिक : येत्या रविवारी पार पडणाऱ्या कुंभपर्वणीच्या दुसऱ्या शाहीस्नानाच्या सोहळ्यासाठी शहरात सुमारे पंधरा हजारांहून अधिक पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याबरोबरच राज्य राखीव दल, केंद्रीय सुरक्षा दल, शीघ्र कृती दल, सीमा सुरक्षा दलाचे जवान शहरात दाखल झाले आहे.दुसऱ्या शाहीस्नानाच्या पर्वणीसाठी शहरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी शहराची पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहराबाहेरून आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांनी रंगीत तालीम पूर्ण करून घेतली आहे. फेरनियोजनानुसार आपत्कालीन मार्ग, भाविक मार्ग, प्रशासकीय मार्ग, स्नानाचे घाट, नो-एन्ट्री, नो-व्हेईकल झोन आदिंची माहिती अतिरिक्त पोलीस बळाला अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. येत्या शनिवारी (दि.१२) संध्याकाळपासून शहरात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या पर्वणीसाठी अंतर्गत वाहनतळ जवळ आणले असून, शहर बससेवाही बाह्य वाहनतळापासून अंतर्गत वाहनतळापर्यंत शटल बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे भाविकांची गैरसोय टळणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)