अॅड. वसईकर यांचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:42 IST2020-10-12T20:23:21+5:302020-10-13T01:42:36+5:30
येवला : येवला-नाशिक महामार्गावर मोटरसायकल अपघातात शहरातील अॅड. श्रीकेश सतीशचंद्र वसईकर (३९) यांचे निधन झाले आहे.

अॅड. वसईकर यांचे अपघाती निधन
ठळक मुद्देमोटरसायकलला कुत्रे आडवे गेल्याने त्यांचा अपघात
येवला : येवला-नाशिक महामार्गावर मोटरसायकल अपघातात शहरातील अॅड. श्रीकेश सतीशचंद्र वसईकर (३९) यांचे निधन झाले आहे.
येवला-नाशिक महामार्गावरून मोटारसायकलने अॅड. वसईकर निफाड न्यायालयात जात होते. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास रायते शिवारात मोटरसायकलला कुत्रे आडवे गेल्याने त्यांचा अपघात झाल्याने गंभीर जखमी झाले.
त्यांचेवर येवला येथील खाजगी रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. नाशिक येथे उपचारासाठी हलवले जात असतांना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अॅड. वसईकर यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुल, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहेत.