कर्णबधिर दिनानिमित्त उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:29 IST2019-10-13T22:40:53+5:302019-10-14T00:29:45+5:30
कर्णबधिर व्यक्तींना समाजाने सहानुभूती दाखविण्यापेक्षा समाजात सामावून घेण्याची भूमिका ठेवावी, असे मत डॉ. संदीप मंडलेचा यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने ‘पडसाद’, कर्णबधिर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनानिमित्त आयोजित ‘वाचा आणि श्रवण’ दोषांवर मोफत चिकित्सा शिबिर कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांसह डॉ. सुनील सौंदाणकर. समवेत प्रा. श्रीकांत सोनवणे, प्रा. सूचेता सौंदाणकर, सतीश शेटे, कपिल गुजर, मनीषा भावे, प्रमोद पवार, अनिकेत पगार, ज्ञानेश्वर धामणे आदी.
नाशिक : कर्णबधिर व्यक्तींना समाजाने सहानुभूती दाखविण्यापेक्षा समाजात सामावून घेण्याची भूमिका ठेवावी, असे मत डॉ. संदीप मंडलेचा यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने ‘पडसाद’, कर्णबधिर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कर्णबधिरांसाठी यावेळी ‘पर्सेप्शन क्लिनिक’द्वारे वाचा आणि श्रवण दोषांवर मोफत चिकित्सा शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. शिबिराच्या माध्यमातून कर्णबधिर समस्या असलेल्या सर्व वयोगटातील तीनशेहून अधिक वाचा आणि श्रवण विकलांगांनी लाभ घेतला. सदर शिबिर हे आठवडाभर सुरू राहणार असून, या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आॅडिओलॉजिस्ट डॉ. शंतनू व डॉ. सुनील सौंदाणकर यांनी केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिताना शालोपयोगी वस्तू, खाऊ व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. श्रीकांत सोनवणे, प्रा. सूचेता सौंदाणकर, सतीश शेटे, कपिल गुजर, मनीषा भावे, प्रमोद पवार, अनिकेत पगार, ज्ञानेश्वर धामणे आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिन साजरा करीत शहरातील पंचवटी कारंजा, जेहान सर्कल, लेखानगर शॉपिंग सेंटर आदी भागांत पडसाद शाळेच्या विद्यार्थ्यांनी कर्णबधिरांच्या क्षमता बांधणी व कौशल्याची झलक दाखवित जनजागृतीपर पथनाट्येदेखील सादर केले.