शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

गंगापूरला जनावरे चोरणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:08 IST

गावातील नुरानी चौकात मध्यरात्री चारचाकी वाहनातून आलेले चोरटे आणि पोलिसांमध्ये थरारनाट्य घडले. मोकाट गुरे चोरण्याच्या हेतूने आलेल्या टोळीचा पोलिसांनी पाठलाग केल्याने चोरटे चार गुरे रस्त्यातच सोडून फरार झाले.

गंगापूर : गावातील नुरानी चौकात मध्यरात्री चारचाकी वाहनातून आलेले चोरटे आणि पोलिसांमध्ये थरारनाट्य घडले. मोकाट गुरे चोरण्याच्या हेतूने आलेल्या टोळीचा पोलिसांनी पाठलाग केल्याने चोरटे चार गुरे रस्त्यातच सोडून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून गुरांना शुद्धीवर आणले.जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून त्यांना चारचाकी वाहनातून पळवून नेणारी टोळी सध्या गंगापूर भागात कार्यरत झाली असून, गावातील नुरानी चौकाजवळ असलेल्या पटांगणावर काही मोकाट जनावरे रात्रीच्या सुमारास विश्रांतीसाठी थांबतात. हीच संधी साधून शुक्रवारी पहाटे चारचाकी वाहनातून तीन ते चार जणांनी मोकळ्या मैदानात बसलेल्या मोकाट गुरांना काही तरी टोचले. सदरची बाब एका नागरिकाच्या लक्षात आली, त्याचवेळी गंगापूर पोलिसांचे गस्ती वाहनही तेथे आल्याने चोरट्यांनी वाहनासह धूम ठोकली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु चोरटे फरार झाले. दरम्यान चोरट्यांनी चार गुरांना भुलीचे इंजेक्शन टोचल्याचे लक्षात आले असता काही नागरिकांनी महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय अधिकारी तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. आर. कुटे यांना माहिती दिली असता, डॉ. कुटे व डॉ. जे. सी. जाधव यांनी घटनास्थळी येऊन बेशुद्धावस्थेत असलेल्या गुरांना औषधोपचार करून शुद्धीवर आणले.पशुधन वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना करावीयापूर्वीही कलाबाई रामदास वाघ यांची गाय व वासरू चोरीला गेले असून, पोलिसांत तक्रार देऊनही अद्याप सापडलेले नाही. त्याचीच पुन्हा पुनरावृत्ती होताना टळली असून, या भागातील पशुधन वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.गंगापूर गावात व परिसरात भुरट्या चोºया, मोकाट गुरे (पशुधन) चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून, यामागे टोळी सक्रिय झाल्याचे दिसते. त्यामुळे गंगापूर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोरांचा बंदोबस्त करावा, जेणेकरून पुन्हा पुन्हा या घटना घडणार नाहीत.- अ‍ॅड. सुदर्शन पाटील, गंगापूरचारही गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुध्द करण्यात आले होते. चोरी करण्याच्या उद्देशानेच चोरांकडून गुरांना प्रथम गुंगीचे इंजेक्शन टोचले जाते आणि थोड्या वेळात ते त्यांची हालचाल बंद झाल्याचे पाहून त्यांना गाडीत टाकून वाहतूक करतात.- डॉ. ए. आर. कुटे,पशुधन विकास अधिकारी

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस