विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:11 IST2021-04-19T19:50:08+5:302021-04-20T00:11:07+5:30
मेशी : सोमवारी (दि. १९) तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी पिंपळगाव येथे अचानक भेट दिली. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली तसेच १५ जणांची त्वरित ॲन्टिजेन चाचणीही करण्यात आली.

यावेळी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, पोलीसपाटील यांच्यासोबत चर्चा करुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव येथे विलगीकरण कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यापुढे ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील, त्यांना पिंपळगाव येथील विलगीकरण कक्षात किंवा देवळा येथील विलगीकरण कक्षात १४ दिवस क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.
यावेळी पथकाने पिंपळगावसह मेशी, खुंटेवाडी, वासोळ येथेही अचानक भेट दिली. यापुढे सर्व बेशिस्त नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. देवळा तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सगळ्यांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासन सतर्क झाले असून, शासनाने ३० एप्रिलपर्यंत निर्बंध जाहीर केले आहेत तरीही काही नागरिक विनाकारण फिरत असल्याने तालुका प्रशासनाने ही धडक कारवाई सुरू केली आहे.
(१९ मेशी)
मेशी येथे विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवर वैद्यकीय तपासणी कर्मचाऱ्यांनी ॲन्टिजेन चाचणी केली. यावेळी तालुका पथकातील अधिकारी उपस्थित होते.