नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हृददीत लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडु नये, यासाठी शासनाने वारंवार प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही अनेक नागरीक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने सोमवारी (दि.२२) आजाराच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य न बाळगता संचारबंदी आदेशाचे उल्लघन करणाऱ्या ४७ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे नाशिक शहरात २२ मार्च ते २२ जून या कालावीत एकूण ८ हजार ७८० गुन्हे दाखल करून संबधितावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी सर्व नागरीकांनी मास्क वापरणे बाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आलेले असतांनाही त्यांचे गांभीर्य न घेता ज्या नागरिकांनी घराबाहेर पडतांना मास्कचा वापर केला नाही अशा २४ इसमांवर सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत ३ हजार ३३० जणांवर मास्क वापरला नाही म्हणुन कारवाई करण्यात आलेली आहे. तर शहर वाहतूक शाखेतर्फे २५ मार्च ते २१ या कालावधीत मोटार वाहन कायदयाच्या विविध कलमा अंतर्गत कारवाई एकुण ६१ लाख २ हजार ५००रुपये दंड करण्यात आला आहे. त्यापैकी ८ लाख ६६ हजार ३०० रुपये वसुल करण्यात आला असून ५२ लाख ३६ हजार दोनशे रुपये दंड वसुल करणे बाकी असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ४७ जणांवर कारवाई ; विना मास्क फिणाऱ्यांनाही दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 20:36 IST
लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडु नये, यासाठी शासनाने वारंवार प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही अनेक नागरीक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने सोमवारी आजाराच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य न बाळगता संचारबंदी आदेशाचे उल्लघन करणाऱ्या ४७ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ४७ जणांवर कारवाई ; विना मास्क फिणाऱ्यांनाही दणका
ठळक मुद्देआचार संहिता उल्लंघन प्रकरणी ८ हजार ७८० गुन्हे दाखल ३ हजार ३३० जणांवर मास्क वापरला नाही म्हणुन कारवाई शहर वाहतूक शाखेतर्फे ८ लाख ६६ हजारांचा दंड वसुल