मंगल कार्यालयावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 10:29 PM2021-04-01T22:29:29+5:302021-04-02T01:05:11+5:30

सटाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियम व अटींचे पालन न करता शहरालगत भाक्षी (ता. बागलाण) शिवार हद्दीतील एका लॉन्समध्ये बुधवारी विवाह सोहळा झाला. या विवाह सोहळ्यात नियम धाब्यावर बसवून प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्याने बागलाणचे तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील व पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने तत्काळ कारवाई करण्यात आली.

Action on Mars office | मंगल कार्यालयावर कारवाई

मंगल कार्यालयावर कारवाई

Next
ठळक मुद्दे सटाणा : नियमांचे उल्लंघन प्रकरणी तीन कार्यालय सील

सटाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियम व अटींचे पालन न करता शहरालगत भाक्षी (ता. बागलाण) शिवार हद्दीतील एका लॉन्समध्ये बुधवारी विवाह सोहळा झाला. या विवाह सोहळ्यात नियम धाब्यावर बसवून प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्याने बागलाणचे तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील व पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने तत्काळ कारवाई करण्यात आली.

या लॉन्स मालकावर गुन्हा दाखल केला तसेच भाक्षी रस्त्यावरील इतर तीन मंगल कार्यालये प्रशासनाने पुढील आदेश होईपर्यंत सील केले आहेत.
बुधवारी (दि.३१) सटाणा - भाक्षी रस्त्यावरील भाक्षी शिवारातील जल मल्हार लॉन्स या मंगल कार्यालयात बंदी असतानाही वर्‍हाडींच्या मोठ्या संख्येमध्ये विवाह सोहळा झाल्याची माहिती तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना मिळाल्याने त्यांनी संयुक्तरित्या घटनास्थळी पाहणी करून मंगल कार्यालय मालकांवर सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या विवाह सोहळ्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींचे पालन करण्यात आले नसल्याचे दिसून आले. मास्क व शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन न करता विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता असूनही खबरदारी घेतली नाही. हे कृत्य निष्काळजीपणे आणि धोकादायक असून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कार्यालय मालकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शहरातील जयमल्हार, गुरुप्रसाद, आणि संतोष मंगल कार्यालय ही कार्यालये कोविड नियमांचे पालन करीत नसल्याची बाब निदर्शनास आल्याने तीनही मंगल कार्यालये तहसिलदार श्री.इंगळे-पाटील यांच्या पथकाने सील केली आहेत. नियमांचे पालन न करणारी शहरातील काही दुकानेही प्रशासनाच्या रडारवर असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

Web Title: Action on Mars office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.