महिनाभरात बसणार ऑक्सिजन टाक्या
नाशिक : शहरातील डॉ. झाकीर हुसेन आणि बिटको रुग्णालयात दोन अतिरिक्त ऑक्सिजन टाक्या बसविण्यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. याठिकाणी फाउण्डेशनचे काम सुरू झाले असून, महिनाभरात टाक्या बसवल्या जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. गेल्या महिन्यात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीच्या गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार महापालिकेने दोन्ही मनपा रुग्णालयात तीन किलो लिटर्सच्या दोन टाक्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
----
कोरोनामुळे नाशिक महापालिकेत शुकशुकाट
नाशिक : कोरोनामुळे महापालिकेच्या मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनात शुकशुकाट आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिक अपवादानेच या ठिकाणी जात असून, त्यामुळे नेहमी दिसणारी गर्दी अथवा वर्दळ जाणवत नाही. सध्या महापालिकेच्या सर्व समित्यांचे काम ठप्प आहे. त्यातच निधी नसल्याने नागरी कामे होत नाही. त्यामुळेही नगरसेवकांनी पाठ फिरवली आहे.