शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मगिरीचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 00:52 IST

ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. लवकरच दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांना दिले.   

ठळक मुद्देछगन भुजबळ : ब्रह्मगिरी बचाव समितीच्या सदस्यांनी घेतली भेट

नाशिक : ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. लवकरच दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांना दिले.   ब्रह्मगिरी,सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या उत्खननाबाबत शुक्रवारी ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पहिला किल्ला ब्रह्मगिरी मेटघर येथे सुपलीचा मेट या आदिवासी पाड्याजवळ  सुरुंग लावून, ब्रह्मगिरीच्या पोटात ‘ब्रम्हा ग्रीन’ या प्रकल्पांतर्गत खासगी विकासकाने पेसा व वनहक्क कायद्यांचा भंग करून अवैध उत्खनन केले आहे. त्यामुळे माळीणसारखी दुर्घटना होण्याचा संभव असताना, वनविभाग, महसूल विभाग, खनिकर्म अधिकारी, जिल्हा प्रशासन दुर्लक्ष केले आहे. ब्रह्मगिरीप्रमाणेच संतोषा, भागडी पर्वतरांगेत अनेक वर्षांपासून अवैध उत्खननाने संपूर्ण डोंगरच नेस्तनाबूत केलेला आहे. जिल्ह्यात अवैध उत्खननाने सह्याद्रीचे लचके तोडले जात असून, त्यामुळे वन्यजीव, पर्यावरण, जैवविविधता यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊन संपूर्ण जीवसृष्टीस याचा धोका निर्माण झालेला असल्याचे म्हटले आहे. या प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेची दखल घेऊन ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. लवकरच या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन  दिले आहे. यावेळी ब्रह्मगिरी बचाव समितीचे निशिकांत पगारे, महंत गणेशानंद सरस्वती, दत्तात्रय ढगे, जगबिरसिंह, प्रकाश निकुंभ, कुलदीप कौर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. nसह्याद्री पर्वतरांगेचे संवर्धन, संरक्षणाची जबाबदारी सरकारची असून, सह्याद्री पर्वतरांगेत आता सुरुंग, जिलेटीन कांड्यांचा वापर, खोदकाम, खाणकाम बांधकास पूर्णतः बंदी आणावी. डोंगर उतारावरील जमिनीचा राज्याचे हरित अच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठीच उपयोग करावा. ब्रह्मगिरी उत्खननातील सर्व दोषींची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरChhagan Bhujbalछगन भुजबळ