नाशिकरोडच्या ११ दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:16 IST2020-03-24T23:04:10+5:302020-03-25T00:16:56+5:30
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र लॉकडाउन राज्य शासनाने घोषित केला असतानाही आपली दुकाने उघडी ठेवून व्यवसाय करणाऱ्या ११ दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

नाशिकरोडच्या ११ दुकानदारांवर कारवाई
नाशिकरोड : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र लॉकडाउन राज्य शासनाने घोषित केला असतानाही आपली दुकाने उघडी ठेवून व्यवसाय करणाऱ्या ११ दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारच्या जनता कर्फ्यूनंतर राज्य शासनाकडून महाराष्ट्रात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, केंद्र व राज्य शासनाचे शासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे.
पंचवटीत हुल्लडबाजांना पिटाळले
पंचवटी : जमावबंदी आदेश न जुमानता पंचवटी परिसरात दुचाकी, चारचाकीवरून हुल्लडबाजी करीत फिरणाऱ्यांना अखेर पोलिसांनी रस्त्यावर उतरून पिटाळून लावले. पंचवटी परिसरातील मुख्य वाहतूक चौकात पोलिसांनी लोखंडी जाळ्या उभारून दोरखंड बांधले. वाहनातून जाणाºया चालकांना थांबवून त्यांची चौकशी करून पुढे सोडले जात होते. पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला होता, तर पेट्रोल पंपदेखील ओस पडलेले होते. रस्त्याने केवळ रुग्णवाहिका, शववाहिका, पालेभाज्या घेऊन जाणारी वाहने अडवली जात होती. गरज नसताना वाहने घेऊन फिरणाºया काही हुल्लडबाजांना दंडुक्याचा प्रसाद दिला.