पोलिसांच्या ताब्यातून पळालेला आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 00:54 IST2021-02-12T00:54:02+5:302021-02-12T00:54:33+5:30

औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे या आरोपीला रेल्वेस्थानकावर सापळा रचून पकडण्यात यश मिळाले आहे.

Accused who escaped from police custody is in custody | पोलिसांच्या ताब्यातून पळालेला आरोपी ताब्यात

मनमाड  रेल्वेस्थानकावर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीसमवेत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सचिन राऊत आदी.

मनमाड : औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे या आरोपीला रेल्वेस्थानकावर सापळा रचून पकडण्यात यश मिळाले आहे.
मुकुंदवाडी  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी अमर भाऊसाहेब गायकवाड रा. जाधववाडी, औरंगाबाद हा अटकेत असताना पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. हा आरोपी मनमाड रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांकडून मिळाल्याने मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई सुरू केली. पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांना व्हॉट्सॲपवर  आरोपी अमरचा फोटो पाठवून बारकाईने शोध घेण्याचा सूचना देण्यात आल्या. रेल्वेस्थानकावर येणाऱ्या गाड्या व फलाटाची कसून तपासणी करण्यात आली. पो.कॉ. राज बच्छाव यांना हा आरोपी मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये दिसून आला. त्यांनी सपोनि सचिन राऊत, पाटील, पो.ह. केदारे, पवार, डोंगरे, रंगारी यांच्या मदतीने पकडून पोलीस ठाण्यात हजर केले. 

Web Title: Accused who escaped from police custody is in custody