शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:13 AM

कामाचा अतिरिक्त ताण आणि वरिष्ठांच्या दबावामुळेच वडनेर खाकुर्डी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक कौतिक अहिरे यांनी आत्महत्या केल्याचा दावा आरोग्य सेवक कर्मचारी संघटना आणि मयत अहिरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. वरिष्ठांच्या जाचक कामकाजाच्या पद्धतीमुळेच कर्मचारी दबावात काम करीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेनेदेखील केला असून, याप्रकरणी सोमवारी आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान गुरुवारी आरोग्य कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून निषेध नोंदविला.

ठळक मुद्देआरोग्य सेवक : जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात आंदोलन

नाशिक : कामाचा अतिरिक्त ताण आणि वरिष्ठांच्या दबावामुळेच वडनेर खाकुर्डी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक कौतिक अहिरे यांनी आत्महत्या केल्याचा दावा आरोग्य सेवक कर्मचारी संघटना आणि मयत अहिरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. वरिष्ठांच्या जाचक कामकाजाच्या पद्धतीमुळेच कर्मचारी दबावात काम करीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेनेदेखील केला असून, याप्रकरणी सोमवारी आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान गुरुवारी आरोग्य कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून निषेध नोंदविला.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेले आरोग्य सेवक कौतिक बाबूराव अहिरे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांच्या कामाच्या तणावामुळे कौतिक अहिरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. अहिरे यांच्याकडे वडनरे येथील आरोग्य केंद्राबरोबरच अन्य दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचादेखील पदभार होता. शिवाय जिल्हा परिषदेकडून वारंवर आढावा, कामाचे टार्गेट तसेच कारणे दाखवा नोटीस बजविली जात असल्याने आणि सातत्याने मार्चचे टार्गेट हे डिसेंबरमध्येच पूर्ण करण्याचा तगादा लावण्यात आल्यामुळे अहिरे तणावात असल्याचा दावा कुटुंबीय आणि आरोग्य सेवक संघटनेने केला आहे.जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवकांवर सध्या कामाचा मोठा ताण असून, डिसेंबरमध्येच टार्गेट पूर्ण करण्यासाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. याच कारणातून जिल्हा परिषदेने तीन कर्मचाºयांवर निलंबनाचीदेखील कारवाई केली आहे. वास्तविक या कर्मचाºयांचे कामकाज ७० ते ८० टक्क्यांच्यापुढे असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सातत्याने माहिती मागणे, आॅनलाइन माहितीची विचारणा करणे, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मीटिंग तसेच अधिकाºयांकडूनदेखील मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या नावाने धमकी दिली जात असल्याचा आरोप संघटनेकडून होत आहे. केवळ टार्गेट पूर्ण करून विभागात राज्यात आपल्याच कामाचे कौतुक होण्यासाठी कर्मचाºयांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आरोग्यदेखील कर्मचारी संघटनेने केला आहे.याप्रकरणी आता संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, निलंबित तीनही कर्मचाºयांवरील निलंबन मागे घ्यावे, मयत अहिरे यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी आणि या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे करण्यात आली आहे.काळ्या फिती लावून कामजिल्हा परिषदेसमोर दुपारच्या सुमारास आरोग्य कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. आंदोलनात विजय सोपे, बाळासाहेब ठाकरे, एकनाथ वाणी, बाळासाहेब कोठावदे, किशोर अहिरे, अमोल बागुल, अनिल भामरे, प्रवीण पाटील, विलास पगार आदींसह आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSuicideआत्महत्या